Lokmat Sakhi >Gardening > कोण म्हणतं सोनचाफा कुंडीत वाढत नाही? ५ टिप्स- सोनचाफ्यानं डवरेल इटूकलं झाडं-गंधानं भरेल घर

कोण म्हणतं सोनचाफा कुंडीत वाढत नाही? ५ टिप्स- सोनचाफ्यानं डवरेल इटूकलं झाडं-गंधानं भरेल घर

5 Tips To Grow Sonchafa Plant In Pot: सोनचाफ्याचं रोप कुंडीमध्ये लावलेलं असेल तरी त्याची चांगली वाढ होऊ शकते आणि त्याला भरपूर फुलं येऊ शकतात..(gardening tips for sonchafa plant)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2025 16:00 IST2025-07-19T15:46:28+5:302025-07-19T16:00:31+5:30

5 Tips To Grow Sonchafa Plant In Pot: सोनचाफ्याचं रोप कुंडीमध्ये लावलेलं असेल तरी त्याची चांगली वाढ होऊ शकते आणि त्याला भरपूर फुलं येऊ शकतात..(gardening tips for sonchafa plant)

5 tips to grow sonchafa plant in pot, gardening tips for sonchafa plant, how to get maximum flowers from sonchafa plant  | कोण म्हणतं सोनचाफा कुंडीत वाढत नाही? ५ टिप्स- सोनचाफ्यानं डवरेल इटूकलं झाडं-गंधानं भरेल घर

कोण म्हणतं सोनचाफा कुंडीत वाढत नाही? ५ टिप्स- सोनचाफ्यानं डवरेल इटूकलं झाडं-गंधानं भरेल घर

Highlightsतुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून जर सोनचाफा कुंडीमध्ये लावला तर तो ही भरभरून वाढेल

मंद सुगंध दूर दूरपर्यंत पसरवून वातावरण प्रसन्न करून टाकणारं इवलसं फुल म्हणजे सोनचाफा.. प्रत्येक फुलाचं जसं आपलं स्वत:चं वेगळं सौंदर्य असतं, सुगंध असतो तसंच ते सोनचाफ्यालाही आहे. त्याचा सोनसळी पिवळा, केशरी रंग आणि त्याला येणारा सुगंध म्हणजे आहाहा.. त्यामुळेच तर कित्येक जण त्यांच्या अंगणात हौशीने सोनचाफा लावतात. पण आता ज्यांच्याकडे पुरेशी जागा नसते, जे फ्लॅटमध्ये राहतात त्यांना नेहमी असंच वाटत असतं की सोनचाफा कुंडीमध्ये चांगला वाढत नाही. तो जमिनीमध्ये लावला तरच त्याची वाढ होते आणि त्याला फुलं येतात (gardening tips for sonchafa plant). पण असं मात्र मुळीच नाही. तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवून जर सोनचाफा कुंडीमध्ये लावला तर तो ही भरभरून वाढेल (5 tips to grow sonchafa plant in pot) आणि त्यालाही भरपूर फुलं येतील. त्यासाठी काय करायचं पाहा...(how to get maximum flowers from sonchafa plant?)

 

सोनचाफा कुंडीत कसा लावावा?

सोनचाफा कुंडीमध्ये लावायचा असेल तर त्याची कशी काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी कराव्या तसेच कोणत्या टाळाव्या याविषयी माहिती देणारा व्हिडिओ vrukshavalli_ratnagiri या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये सांगितलेल्या काही खास टिप्स..

दाढ ठणकू लागली? लगेच औषधं- गोळ्या नको, 'हा' उपाय करून पाहा- १५ मिनिटांत दुखणं थांबेल

१. सोनचाफा ज्या कुंडीमध्ये लावणार आहात तिचा आकार थोडा मोठा असावा. साधारण १२ इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराचीच कुंडी निवडा. जेणेकरून सोनचाफ्याला त्यात व्यवस्थित वाढता येईल. मुळांना पसरायला जागा मिळेल.

 

२. सोनचाफ्यासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी माती हवी असते. त्यासाठी माती, रेती, गांडूळ खत, कोकोपीट यांचं मिश्रण असणारी माती कुंडीमध्ये भरावी.

भुमी पेडणेकर ते विद्या बालन.. कोणी १५ तर कोणी २५ किलोने वजन घटवलं! कसं जमलं त्यांना?

३. आठवड्यातून एकदा गांडूळ खत, शेण खत असे सेंद्रिय खत सोनचाफ्याला द्यावे. कारण रोप कुंडीत असेल तर मातीची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी तिच्यामध्ये वेळोवेळी खत घालणे गरजेचे आहे. सेंद्रिय खतासोबतच मायक्राे न्युटियंट्स, तसेच एनपीके खतही थोड्या प्रमाणात द्यावे.

 

४. सोनचाफ्याच्या रोपाला ऊन आणि पाणी यांची खूप गरज आहे. त्यामुळे पाणी भरपूर घालत राहा आणि जिथे चांगलं ऊन येईल अशा ठिकाणी कुंडी ठेवा.

सॅण्डविचचा बेत? ब्रेडला लावा भरपूर प्रोटीन्स देणारा 'हा' पदार्थ- चीज, मेयोनिजची गरजच नाही

५. सोनचाफ्याची नियमितपणे छाटणी करणे खूप गरजेचे आहे. छाटणी जेवढी कराल तेवढी लवकर नवी पालवी फुटेल. पाकळ्या गळून गेलेलं देठ लगेच काढून टाका. नाहीतर त्याला फळं लागतात आणि फळं लागायला सुरुवात झाली की फुलांची संख्या कमी होत जाते. 


 

Web Title: 5 tips to grow sonchafa plant in pot, gardening tips for sonchafa plant, how to get maximum flowers from sonchafa plant 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.