Lokmat Sakhi >Gardening > मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

5 Tips For The Blooming Of Mogra Plant: येत्या हंगामात मोगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी या काही गोष्टी लगेचच करून पाहा..(which is the best fertilizer for jasmine or mogra plant?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2025 15:29 IST2025-02-14T15:27:06+5:302025-02-14T15:29:45+5:30

5 Tips For The Blooming Of Mogra Plant: येत्या हंगामात मोगऱ्याच्या रोपाला भरभरून फुलं येण्यासाठी या काही गोष्टी लगेचच करून पाहा..(which is the best fertilizer for jasmine or mogra plant?)

5 tips for the blooming of mogra plant, which is the best fertilizer for jasmine or mogra plant? how to take care of mogra plant for getting maximun flowers | मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

मोगरा फुलण्याचे दिवस आले! मोगऱ्याला भरभरून फुलं येतील, फक्त ५ गोष्टी करा-सुगंधानं बहरुन जाईल घर

Highlightsमोगऱ्याचं रोप जर तुम्ही लहान आकाराच्या कुंडीमध्ये लावलं असेल तर ते लगेचच मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये हलवा.

उन्हाळा आला की त्यापाठोपाठ मोगरा, मधुमालती, मधुकामिनी अशी सुवासिक फुलंही भरभरून येऊ लागतात. उन्हाळ्यात वाऱ्याच्या झुळूकेसोबत जेव्हा मोगऱ्याचा मंद सुगंध येऊ लागतो तेव्हा मन कसं प्रसन्न होऊन जातं. आता मार्चपासून माेगरा खऱ्या अर्थाने बहरायला सुरुवात होते. पण काही जणांचं दुखणं हे असतं की पुरेशी काळजी घेऊनही त्यांचं माेगऱ्याचं रोप व्यवस्थित बहरत नाही. किंवा मग रोप नुसतंच वाढतं आणि त्याला फुलं मात्र अजिबातच येत नाहीत. क्वचित कधीतरी एखादं फूल उमलून जातं (which is the best fertilizer for jasmine or mogra plant?).. तुमच्याही घरच्या माेगऱ्याचं असंच झालं असेल तर या काही गोष्टी करून पाहा (how to take care of mogra plant for getting maximun flowers?).. येत्या हंगामात मोगऱ्याला भरभरून फुलं येतील.(5 tips for the blooming of mogra plant)

 

मोगऱ्याला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय

१. मोगऱ्याचं रोप जर तुम्ही लहान आकाराच्या कुंडीमध्ये लावलं असेल तर ते लगेचच मोठ्या आकाराच्या कुंडीमध्ये हलवा. १२ इंच किंवा त्यापेक्षा मोठ्या आकाराची कुंडी मोगऱ्याच्या रोपाच्या वाढीसाठी उत्तम मानली जाते.

चमचाभर कॉफी घेऊन 'या' पद्धतीने चेहऱ्याला लावा! टॅनिंग, ब्लॅकहेड्स जाऊन त्वचेवर येईल ग्लो

२. जेव्हा मोगऱ्याच्या कुंडीमध्ये तुम्ही माती भरत असाल तेव्हा ती माती पाणी घट्ट धरून ठेवणारी नको. मोगऱ्याच्या रोपाची माती नेहमीच भुसभुशीत आणि पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. त्यासाठी मातीमध्ये थोडं कोकोपीट, गांडूळ खत आणि थोडीशी वाळू एकत्र करून मगच कुंडी भरा.

 

३. माेगऱ्याच्या रोपाची कुंडी नेहमीच पुरेशा उन्हामध्ये ठेवावी. मोगऱ्याला ३ ते ४ तास तरी चांगलं ऊन मिळायला पाहिजे.

'या' तेलात तळलेले पदार्थ खा! डॉक्टर सांगतात वजनही वाढणार नाही आणि हृदयही राहील ठणठणीत 

४. मोगऱ्याच्या रोपाला कधीही खूप जास्त पाणी घालू नये. माती ओलसर राहील एवढं पाणी त्याला पुरेसं असतं. त्यामुळे नेहमी अंदाज घेऊनच मोगऱ्याला पाणी घाला.

५. मेथी दाण्यांची पावडर आणि हळद २: १ या प्रमाणात एकत्र करा आणि मोगऱ्याच्या कुंडीतल्या मातीमध्ये एक चमचा घाला. हे मोगऱ्यासाठी खूप चांगलं खत आहे. १५ दिवसांतून एकदा हा उपाय करा. मोगऱ्याला भरपूर फुलं येतील. 
 

Web Title: 5 tips for the blooming of mogra plant, which is the best fertilizer for jasmine or mogra plant? how to take care of mogra plant for getting maximun flowers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.