lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Gardening > उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer : उन्हाच्या कडाक्यात झाडे कोमेजून जावू नये म्हणून..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2024 06:54 PM2024-04-19T18:54:10+5:302024-04-19T18:54:59+5:30

5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer : उन्हाच्या कडाक्यात झाडे कोमेजून जावू नये म्हणून..

5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer | उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

उन्हाळ्यात कुंडीतल्या फळझाडांची पानं पिवळी-फळंच येत नाहीत? ५ टिप्स, फळांनी डवरेल झाड

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' या ओळीचा अर्थ आपल्याला ठाऊक आहे (Summer Special). झाड आपल्याला गारवा देतात. ऑक्सिजन, फळे-फुले, यासह बरेच गोष्टी देतात. उन्हाळ्यात वातावरण थंडगार ठेवण्यासाठी झाडं मदत करतात. यासाठी आपण घरात छोट्याशा बागेत विविध प्रकारची झाडं लावतो (Gardening Tips). तुळस, कडुलिंब, गुलाब ही झाडं प्रत्येक बागेत आढळतात. वृक्षारोपण करणे किंवा घरामध्ये कुंडीत विविध प्रकारची झाडे लावणे आवश्यक आहे. शिवाय त्यांची योग्य काळजी घेणंही गरजेचं आहे.

उन्हाळ्यात झाडांचे प्रचंड नुकसान होते. कधी पानं पिवळी पडतात. तर कधी झाडांना व्यवस्थित फुलं किंवा फळं येत नाही. पण मग उन्हाळ्यात झाडांची काळजी कशी घ्यावी असा प्रश्न निर्माण होतो. उन्हाळ्यात झाडांची योग्य काळजी घ्यायची असेल तर, आपण ५ ट्रिक्सचा वापर करू शकता. यामुळे संपूर्ण उन्हाळ्यात झाडं टवटवीत फ्रेश राहतील(5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer).

घरात ऋतूनुसार झाडं लावा

उन्हाळ्यात जी झाडं जगतील, तिच घराच्या बागेत लावा. या झाडांची विशेष काळजी घेण्याची गरज भासणार नाही. आपण उन्हाळ्यात हिरवी मिरची, तुळस, वांगी आणि लिंबूचे झाड लावू शकता. ही झाडं उन्हाळ्यात छान बहरतात. शिवाय या झाडांमागे अधिक मेहनत घ्यावी लागत नाही.

कीड लागून झाडं सुकायला लागलीय? किचनमधल्या २ गोष्टींचा करा 'असा' वापर; रोप वाढेल आणि..

वेळोवेळी पाणी घाला

उन्हाळ्यात झाडांना दोन वेळा पाणी घाला. याशिवाय झाडांना पाणी देण्यासाठी सकाळ किंवा संध्याकाळची वेळ निवडावी. कडक सूर्यप्रकाशात झाडांना पाणी देणे टाळा.

सूर्यप्रकाश महत्वाचा

झाडांच्या वाढीसाठी सूर्यप्रकाशाची गरज असते. परंतु, उन्हाळ्याच्या हंगामात सूर्यप्रकाश खूप प्रखर असतो. त्यामुळे झाडे कोमेजून जातात. अशावेळी झाडांवर नेहमी शेड्स बसवा, जेणेकरून झाडांना प्रकाश मिळत राहील. घरातील रोपांना जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते. परंतु, झाडांना अंधारात ठेवणे टाळा. त्यांना किमान नैसर्गिक प्रकाश मिळेल याची खात्री करा.

तुळस कडक उन्हात वाळते? पानं पिवळी पडतात? १ ट्रिक-भर उन्हातही तुळस डवरेल

मातीतील ओलावा राखून ठेवा

उन्हाळ्यात मातीतील ओलावा टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आपण ओव्हरवॉटरिंग करावे. तसेच झाडांना पाणी देताना पानांवर व फांद्यावरही पाणी शिंपडावे.

मातीत घाला खत

ज्याप्रमाणे झाडांना पाणी आणि सूर्यप्रकाशाची गरज असते, त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी खतही तितकेच महत्त्वाचे असते. तसे, आपण झाडांच्या चांगल्या वाढीसाठी घरी खत देखील बनवू शकता. याशिवाय सेंद्रिय खतेही बाजारात उपलब्ध आहेत.

Web Title: 5 Simple and Effective Tips to protect your Plants in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.