तुळस जवळपास सगळ्याच घरात असते. कारण आरोग्याच्या दृष्टीने तुळशीचे जसे भरपूर फायदेे आहेत, तशीच ती धार्मिक दृष्ट्याही अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे तुमचं घर लहान असो किंवा मोठं असो, घराच्या आसपास जागा असाो किंवा नसो तसेच तुम्हाला गार्डनिंगची आवडी असो किंवा नसो, पण तुमच्या घरात तुळशीचं एक छोटंसं रोप नक्कीच असतं. पण काही जणांची ही खंत आहे की काही केल्या तुळशीचं रोप नीट वाढतच नाही (how to take care of tulsi plant?). आता आपण अशी ५ मुख्य कारणं पाहूया ज्यामुळे तुळशीच्या रोपाची वाढ खुंटते आणि ती छान हिरवीगार, डेरेदार होत नाही.(avoid 5 mistakes while growing tulsi plant)
तुळशीच्या रोपाची वाढ का होत नाही?
तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होत नसल्यास कोणत्या गोष्टी तपासून घ्यायला पाहिजेत, याची माहिती plantwithmayu या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.
नवरात्रीच्या उपवासाची 'अशी' करून ठेवा तयारी- ऐनवेळची धावपळ टळून उपवासाचे पदार्थ होतील झटपट
१. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या तुळशीच्या कुंडीतली माती तपासून पाहा. कुंडीतली माती अगदी दगडासारखी घट्ट झाली असेल तर अशा मातीमध्ये तुळस चांगली वाढत नाही. तुळशीला नेहमीच भुसभुशीत माती हवी असते. त्यामुळे महिन्यातून एकदा कुंडीतली माती भुसभुशीत करून घ्या.
२. तुळशीला येणाऱ्या मंजुळा आणि त्याखालचा थोडासा भाग नियमितपणे काढून टाकायला हवा. मंजुळा जर वाढत राहिल्या तर तुळशीची वाढ खुंटत जाते.
३. तुळशीचं रोप खूप जास्त उन्हात तसेच खूप सावलीमध्ये ठेवू नका. अर्धा दिवस ऊन आणि अर्धा दिवस सावली येईल अशा पद्धतीने तुळशीचं रोप ठेवा.
फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या सडतात? 'या' टिप्स पाहा- १५ दिवस भाज्या राहतील एकदम फ्रेश
४. तुळशीला रोज खूप पाणी घालू नका. अगदी थोडंसं पाणी तिला पुरेसं असतं. अनेक घरांमध्ये तुळशीला खूप पाणी घातलं जातं, त्यामुळे तिची मुळं सडतात आणि ती चांगली वाढत नाही.
५. तुळशीच्या कुंडीतल्या मातीमध्ये महिन्यातून एकदा थोडं गांडूळखत नक्की घाला. यामुळे जमिनीचा कस टिकून राहातो आणि तुळशीची चांगली वाढ होते.