Lokmat Sakhi >Gardening > मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...

मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...

5 Easy Ways To Grow a Money Plant At Home : Here's How To Grow A Money Plant At Home : 5 Easy Ideas to Grow Bushy Money plant At Home : 5 Easy Ways to Grow a Money Plant at Home : मनी प्लांट आपण कोणकोणत्या वेगळ्या ५ पद्धतींनी लावू शकतो ते पाहूयात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2025 22:16 IST2025-05-05T16:46:12+5:302025-05-05T22:16:46+5:30

5 Easy Ways To Grow a Money Plant At Home : Here's How To Grow A Money Plant At Home : 5 Easy Ideas to Grow Bushy Money plant At Home : 5 Easy Ways to Grow a Money Plant at Home : मनी प्लांट आपण कोणकोणत्या वेगळ्या ५ पद्धतींनी लावू शकतो ते पाहूयात.

5 Easy Ways to Grow a Money Plant at Home How To Grow A Money Plant At Home 5 Easy Ideas to Grow Bushy Money plant At Home | मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...

मनी प्लांट लावण्याच्या ५ नव्या पद्धती, वेल वाढेल भराभर, घर दिसेल आकर्षक - सजावट सुंदर...

आपल्यापैकी बऱ्याचजणांना गार्डनिंग करण्याची मोठी आवड असते. यासोबतच, काहीजण घरात, बाल्कनीत किंवा गार्डनमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रोप लावून घराची शोभा (5 Easy Ways To Grow a Money Plant At Home) वाढवतात. आपल्या सगळ्यांच्याच घरात काही रोप ही फारच कॉमन असतात, बहुतेकजणांच्या घरात किंवा बाल्कनीत अशी रोप हमखास असतात. जास्वंद, कोरफड, तुळस ही त्यापैकीच काही कॉमन रोप आहेत, यात मनी प्लांटचा (Here's How To Grow A Money Plant At Home) देखील समावेश होतो. हिरवीगार, सुंदर पान असणारा मनी प्लांटचा वेल घरात असणे याहून दुसरे कोणते मोठे सुख नाही(5 Easy Ways to Grow a Money Plant at Home).

घरात मनी प्लांट आपण सगळे हमखास लावतोच. परंतु अनेकदा बऱ्याचजणांची तक्रार असते की मनी प्लांटचा वेल भरभर वाढत नाही, पानं पिवळी पडतात - सुकतात. यासाठीच, मनी प्लांटचे रोप लावताना आपण ते वेगवेगळ्या पद्धतींनी लावू शकतो. सुंदर वाढणारा हिरवागार मनी प्लांटचा वेल दिसायला इतका सुंदर दिसतो की पाहूनच मन प्रसन्न होते. घरात किंवा बाल्कनीत मनी प्लांटचा वेल लावला तर वातावरण प्रसन्न वाटते, इतकंच नव्हे तर घराला देखील शोभा येते. यासाठी मनी प्लांट आपण कोणकोणत्या वेगळ्या ५ पद्धतींनी लावू शकतो ते पाहूयात. 

मनी प्लांट लावण्याच्या पद्धती... 

१. मनी प्लांट पाण्यांत लावा :- बरेचजणांना मनी प्लांटचे रोप पाण्यात लावायला आवडते. मनी प्लांट लावण्याची ही सगळ्यात सोपी आणि फारच कॉमन पद्धत आहे. यासाठी आपण काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांचा वापर करू शकता. एका काचेच्या पारदर्शक बाटलीत पाणी भरुन तुम्ही यात मनी प्लांटचा वेल सोडू शकता. यामुळे मनी प्लांटचा वेल भराभर वाढण्यास मदत होते. या बाटलीतील पाणी दर ७ ते १० दिवसांनी बदलावे तसेच बाटली दिवसांतील  काही तास हलक्या सूर्यप्रकाशात ठेवावी. थेट सूर्यप्रकाशात ठेवणे टाळावे. अशाप्रकारे आपण मनी प्लांट पाण्यांत लावू शकता. 

कोथिंबीरीचे देठ फेकू नका, ‘असं’ ठेवा पाण्यात आणि रोज मिळेल ताजी कोवळी हिरवीगार कोथिंबीर...

२. मनी प्लांट मातीत लावा :- पाण्यासोबतच काहीजणांना मनी प्लांट मातीत रुजवून लावायला देखील आवडते. मनी प्लांट लावण्याची ही दुसरी कॉमन पद्धत आहे. मनी प्लांट मातीत कुंडीत लावला असेल तर मातीसुदधा बदलत राहा. मातीत चांगल्या गुणवत्तेचं खत घाला. मनी प्लांटच्या वाढीसाठी कुंडीतल्या मातीत एप्सम सॉल्ट मिसळा, एप्सम सॉल्ट प्रभावी ठरते.  ज्यामुळे मनी प्लाटंवर बुरशी येत नाही वेगाने वाढते आणि पानांचीही वाढ होते आणि पानांना बुरशी येत नाही. पोषक तत्व मिळाल्याने पान लांब होतात. मनी प्लांट लावल्यानंतर माती महिन्यातून एकदा बदलत राहा. शेणखत पाण्यात मिसळून घाला.  ज्यामुळे मनी प्लांटची वेगाने वाढ होईल.

बागेतील नागवेलींच्या वेलीला घाला 'हे' पांढरे पाणी, विड्याची पानं होतील मोठी आणि वेल वाढेल जोमाने...

३. मनी प्लांट लावण्यासाठी कोकोपीट मिक्स :- मनी प्लांट आपण कोकोपीटमध्ये देखील लावू शकता. यासाठी एका कुंडीत कोकोपीट, कंपोस्ट खत आणि वाळू घ्यावी. या तिघांचे एकत्रित मिश्रण तयार करून त्यात मनी प्लांटचा वेल लावावं. कोकोपीट, कंपोस्ट खत आणि वाळू यांच्या एकत्रित मिश्रणाने मनी प्लांटच्या मुळांना मजबुती मिळते, ज्यामुळे त्यांची वाढ दुप्पट वेगाने होते. 

४. मॉस स्टिक्स किंवा ट्रीलस :- आपण मनी प्लांट्सचा वेल मॉस स्टिक्स किंवा ट्रीलसचा आधार देऊन देखील वाढवू शकतो. बाजारांत वेगवेगळ्या आकाराच्या आणि साईजच्या मॉस स्टिक्स विकत मिळतात. या मॉस स्टिक्स तुम्ही मातीत रोवून त्याभोवती मनी प्लांट्सचा वेल गुंडाळून लावू शकता. मॉस स्टिक्समधील ओलावा वेल झटपट वाढण्यास अधिक मदत होते. यासोबतच, आपण जाळीदार ट्रीलसचा देखील वापर करू शकतो. एखादी बारीक जाळी किंवा काट्यांचा वापर करून देखील आपण जाळी तयार करू शकता. ट्रिल्सच्या मदतीने वेल अगदी पटकन वाढतो. तसेच घराची किंवा बाल्कनीची शोभा वाढवण्यासाठी ट्रेल्सवर मनी प्लांट्सचा वेल लावणे अधिक सुंदर व आकर्षक दिसते.

 मोगरा फुलला! पाटीवर लिहिण्याचा खडू करेल कमाल, पांढऱ्याशुभ्र कळ्यांचा बहर - सुगंध दरवळेल दारी...

५. हँगिंग कुंड्या किंवा पॉट्स :- हँगिंग कुंड्यामध्ये जर या हिरव्यागार मनी प्लांटचा वेल लावला तर तो दिसताना अधिकच सुंदर दिसतो. घराची किंवा बाल्कनीची सजावट करण्यासाठी बरेचजण अशा प्रकारे हँगिंग कुंड्यांमध्ये मनी प्लांट लावणे पसंत करतात.

Web Title: 5 Easy Ways to Grow a Money Plant at Home How To Grow A Money Plant At Home 5 Easy Ideas to Grow Bushy Money plant At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.