हल्ली फ्लॅट संस्कृतीमुळे घराभोवती मोकळं अंगण, त्या अंगणात लावलेली रोपं हे चित्र खूप कमी दिसत आहे. पण तरीही ज्यांना गार्डनिंगची मनापासून आवड आहे ते फ्लॅटच्या बाल्कनीचा किंवा टेरेसचा खूप छान उपयोग करतात आणि तिथं वेगवेगळी रोपं हौशीने फुलवतात. जी काही रोपं आवर्जून घरांमध्ये लावली जातात त्यापैकी एक म्हणजे जास्वंद. कारण जास्वंदाला येणारी टपोरी फुलं पाहून मन प्रसन्न होतं. शिवाय ही फुलं रोज देवालाही वाहता येतात. जास्वंदाच्या रोपाचा आणखी एक फायदा म्हणजे खूप काळजी न घेताही हे रोप चांगलं वाढतं. पण बऱ्याचदा असं होतं की रोप तर चांगलं वाढतं पण त्याला म्हणावी तशी फुलं येत नाहीत. असं तुमच्याही रोपाच्या बाबतीत होत असेल तर जास्वंदाची काळजी कशी घ्यायची, त्याला भरपूर फुलं येण्यासाठी काय करायचं ते पाहूया...(4 tips for getting maximum flowers from jaswand plant)
जास्वंदाच्या रोपाला भरपूर फुलं येण्यासाठी उपाय
पुढे सांगितलेले काही उपाय तुम्ही केले तर जास्वंदाला भरपूर फुलं तर येतीलच पण फुलांचा आकारही अतिशय टपोरा होईल. त्यासाठी अगदी साध्या सोप्या काही गोष्टी नेमानं करा...
१. त्यापैकी पहिली गोष्ट म्हणजे जास्वंदाच्या रोपाला आठवड्यातून एकदा चहाचं पाणी नक्की द्या. चहामध्ये असणारे घटक मातीला कसदार बनवतात. यासाठी चहा पावडर पाण्यात उकळवून घ्या. यानंतर ती थंड होऊ द्या. ते पाणी गाळून घ्या आणि त्याच्या दुप्पट पाणी टाकून ते डायल्यूट करा. आता हे पाणी आठवड्यातून एकदा जास्वंदाला द्या.
२. जास्वंदाचं रोप हे नेहमी अशा ठिकाणी ठेवावं जिथे त्याला ५ ते ६ तास चांगलं ऊन मिळेल. जेवढं ऊन मिळेल तेवढी त्याची वाढ होईल आणि भरपूर फुलंही येतील.
फक्त १० मिनिटांत करा चिझी गार्लिक ब्रेड, तोंडाला पाणी आणणारा चवदार पदार्थ- घ्या रेसिपी
३. केळीच्या सालीही जास्वंदाला फुलं येण्यासाठी उपयुक्त ठरतात. यासाठी केळीचं साल उन्हात वाळवून घ्या. त्यानंतर त्याचे बारीक तुकडे करा आणि ते कुंडीतल्या मातीत खाेचून ठेवा.
४. खडू किंवा पाटीवरच्या पेन्सिली यांचा चुरा करून जास्वंदाच्या कुुंडीत घाला. त्यातून मिळणाऱ्या कॅल्शियममुळेही जास्वंदाची चांगली वाढ होऊन त्याला भरपूर फुलं येतात.
