तुळस हे धार्मिक महत्त्व असणारं रोप. त्यामुळे घरोघरी तुळस असतेच. घरासमोर कितीही लहान जागा असली तरीही काही अपवाद वगळता जवळपास सगळ्याच घरांसमोर तुळशीचं लहानसं रोप असतंच. या रोपाची चांगली वाढ व्हावी असं वाटतं. पण नेमकं तुळशीचं रोप सारखं सुकतं. किंवा रोज पाणी घालूनही तिची चांगली वाढ होतच नाही. पुरेसं ऊन मिळूनही तुळशीच्या रोपाची अशी अवस्था होत असेल तर मग कुंडीतली माती एकदा तपासून पाहा (3 tips for the fast growth of tulsi plant). तुळशीला जशी पाहिजे तशी माती जर तुम्ही कुंडीमध्ये भरली तर तुमचं तुळशीचं रोप वर्षभर अगदी हिरवगार राहिल आणि शिवाय तिची वाढही चांगली होईल (gardening tips for tulsi or basil plant). त्यासाठी कुंडीतली माती कशी असावी ते पाहा..(How To Make Soil Mix For Tulasi Plant?)
तुळशीच्या कुंडीमध्ये कशी माती असावी?
तुळशीच्या रोपाला पाणी खूप घट्ट धरून ठेवणारी चिकट माती नको असते. तुळशीची माती थोडी भुसभुशीत असणं गरजेचं असतं. कारण पाणी धरून ठेवणारी चिकट माती असली की तुळशीची मुळं त्या मातीमध्ये सडतात आणि मग तिची चांगली वाढ होत नाही किंवा मग तुळस नेहमीच सुकून जाते.
डायबिटीस होण्याआधीच महिलांच्या शरीरात दिसू लागतात २ लक्षणं! धोक्याची घंटा वेळीच ओळखा
म्हणूनच तुळशीच्या कुंडीमध्ये जेव्हा माती भराल तेव्हा सगळ्यात आधी तळाशी खापराचे २- ३ तुकडे किंवा दगड ठेवा. जेणेकरून पाण्याचा योग्य निचरा होईल.
त्यानंतर ६० टक्के माती आणि ३० टक्के वाळू आणि १० टक्के कोकोपीट या प्रमाणात मिश्रण तयार करा आणि ते कुंडीत भरून त्यामध्ये तुळशीचं रोप लावा. अशा पद्धतीने तयार केलेल्या मातीत तुळशीचं रोप छान बहरून येईल.
तुळशीची चांगली वाढ होण्यासाठी या गोष्टींचीही काळजी घ्या..
१. तुळशीच्या रोपाला गरजेपेक्षा जास्त पाणी झालं तरी तिची चांगली वाढ होत नाही. त्यामुळे कुंडीतली माती ओलसर राहिलं एवढंच पाणी तिला घालावं.
२. तुळशीच्या रोपाला दिवसातून ३ ते ४ तास ऊन मिळायला हवं. चांगलं ऊन मिळालं की तुळशीची चांगली वाढ होेते.
३. आठवड्यातून एकदा कुंडीतल्या मातीचा वरचा थर खुरपण्याची थोडा थोडा उकरावा. यामुळे मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचून तुळशीची चांगली वाढ होण्यास मदत होते.