Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > पाहा जगातील सर्वात महागडा तांदूळ, चवीला भारी पण किंमत पळवेल तोंडचं पाणी

पाहा जगातील सर्वात महागडा तांदूळ, चवीला भारी पण किंमत पळवेल तोंडचं पाणी

Most Expensive Rice : आपल्याला माहीत आहे का की, जगातील सगळ्यात महागडा तांदूळ कोणता आणि त्याची किंमत किती? जर याचं उत्तर आपण वाचलं तर नक्कीच आपल्याला धक्का बसेल.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 17:47 IST2026-02-12T11:27:25+5:302026-02-12T17:47:57+5:30

Most Expensive Rice : आपल्याला माहीत आहे का की, जगातील सगळ्यात महागडा तांदूळ कोणता आणि त्याची किंमत किती? जर याचं उत्तर आपण वाचलं तर नक्कीच आपल्याला धक्का बसेल.

Worlds most expensive rice Kinmemai Premium, know its price | पाहा जगातील सर्वात महागडा तांदूळ, चवीला भारी पण किंमत पळवेल तोंडचं पाणी

पाहा जगातील सर्वात महागडा तांदूळ, चवीला भारी पण किंमत पळवेल तोंडचं पाणी

Most Expensive Rice : जेवणाच्या ताटात जर चपाती, भाजी आणि वरणासोबत भात नसेल तर अनेकांना जेवणच जाणार नाही, इतका काही लोकांना भात आवडतो. वरण - भात तर अनेकांचा जीव की प्राण असतो. गरमागरम भात, त्यावर वरण आणि चमचाभर तूप जो काही आनंद देतो, तो क्वचितच कशातून मिळत असेल. बरं केवळ साधा भातच नाही तर तांदळाचे कितीतरी पदार्थ लोक आवडीने आणि भरपूर खातात. भारतात तब्बल ६ हजारांपेक्षा तांदळाच्या प्रजातींचं उत्पादन घेतलं जातं. ज्यांची सरासरी किंमत १०० रूपये ते ३०० रूपये किलोपर्यंत असते. पण आपल्याला माहीत आहे का की, जगातील सगळ्यात महागडा तांदूळ कोणता आणि त्याची किंमत किती? जर याचं उत्तर आपण वाचलं तर नक्कीच आपल्याला धक्का बसेल.

जगातील सगळ्यात महाग तांदूळ

CNN च्या एका रिपोर्टनुसार, जपानचा किन्मेमई प्रीमिअमचा २०१६ च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगातील सगळ्यात महाग तांदूळ म्हणून नोंद आहे. या तांदळाची केवळ किंमतच नाही तर याच्या उत्पादनाची पद्धती आणि टेस्टही याला वेगळं बनवते. किन्मेमई प्रीमिअम तांदळाच्या ८४० ग्रॅम वजनाच्या एका बॉक्सची किंमत साधारण १०,८०० जपानी येन म्हणजेच जवळपास ६ ते ७ हजार रूपये इतकी असते. तर लॉन्चवेळी हा तांदूळ ९४९६ येन म्हणजे साधारण ९८७२ रूपये प्रतिकिलो विकला गेला होता. तसेच वेगवेगळ्या मार्केटमध्ये हा तांदूळ आज १२, ५०० ते १५, ००० रूपये प्रति किलो विकला जातो.

का आहे इतकी किंमत?

किन्मेमई प्रीमिअम तांदूळ हा काही साधारण तांदूळ नाही. या तांदळाचं उत्पादन जपानी कंपनी टोयो राइस कॉर्पोरेशनद्वारे घेतलं जातं. याची खासियत म्हणजे हा तांदूळ ५ वेगवेगळ्या तांदळाचं मिश्रण आहे. आता मुख्य मुद्दा की, हा तांदूळ इतका महाग का आहे? तर याच्या महाग असण्याचं कारण याची चालणारी लांबलचक प्रोसेसिंग आहे. हा तांदूळ कापणीनंतर लगेच बाजारात आणला जात नाही. कापणीनंतर साधारण ६ महिने त्याला जुना होण्यासाठी ठेवलं जातं. कंपनीचा असा दावा आहे की, सहा महिने हा तांदूळ असाच ठेवल्याने त्याची टेस्ट आणि टेक्स्चर आणखी सुधारतं. त्यानंतर खास पद्धतीने तांदळाच्या वरचा थर हटवला जातो, ज्यामुळे त्यातील पोषक तत्व सुरक्षित राहतात.

कशी असते टेस्ट?

काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय की, जेव्हा हा तांदूळ शिजवला जातो, तेव्हा याचे दाणे एखाद्या मौल्यवान हिऱ्यांसारखे चमकतात. टेस्टबाबत सांगायचं तर हा सामान्य तांदळापेक्षा जास्त गोड आणि नटी टेस्ट असलेला असतो. ज्यांनी हा तांदूळ खाल्ला ते सांगतात की, याची टेस्ट बरीच क्रीमी आणि लोण्यासारखी आहे. तोंडात जातात तो विरघळतो.

दरवर्षी केवळ १ हजार बॉक्स

कंपनीने सांगितलं की, ते दरवर्षी या तांदळाचे केवळ १००० बॉक्स तयार करतात. एका बॉक्समध्ये छोटे छोटे १४० ग्रॅमचे ६ पॅकेट असतात. जपानमध्ये तर हा तांदूळ लक्झरी गिफ्टच्या रूपातही लोकांना दिला जातो.

Web Title : दुनिया का सबसे महंगा चावल: अनोखा स्वाद, चौंकाने वाली कीमत।

Web Summary : जापान का किन्मेमई प्रीमियम चावल, दुनिया का सबसे महंगा चावल है, जिसका स्वाद और उत्पादन अनोखा है। ₹12,500-₹15,000 प्रति किलो की कीमत पर, इसका मलाईदार, मक्खन जैसा स्वाद एक विशेष उम्र बढ़ने और प्रसंस्करण विधि से आता है, जिसका वार्षिक उत्पादन सीमित है।

Web Title : World's most expensive rice: A unique taste with a shocking price.

Web Summary : Kinmemai Premium from Japan, the world's costliest rice, boasts a unique flavor and production. Priced at ₹12,500-₹15,000 per kg, its creamy, buttery taste comes from a special aging and processing method, with limited annual production.