हिवाळ्याच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि अतिरिक्त पोषण देणाऱ्या पदार्थांची गरज असते. बाहेर कडाक्याची थंडी असताना, गरम आणि पौष्टिक सूप पिणे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय आहे. अशावेळी, मिक्स व्हेज सूप (Mixed Veg Soup) म्हणजे परफेक्ट पदार्थ.. थंडीत गरमागरम सूपचा एक घोट घेतला तरी शरीराला एक वेगळीच ऊब मिळते. हे सूप चवीला अप्रतिम तर लागतेच परंतु अनेक आरोग्यदायी भाज्या यात असल्यामुळे ते पिणे हिवाळ्यात आरोग्यासाठी उत्तम मानले जाते(Winter Vegetable Soup Recipe).
ताज्या भाज्यांतील व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि फायबरमुळे हे सूप प्रतिकारशक्ती वाढवते, शरीराला आवश्यक उष्णता देते आणि पचन सुधारते. या सूपमुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि थंडीमुळे येणारा आळस दूर होऊन ऊर्जा टिकून राहते. मिक्स व्हेज सूप तयार करायला खूप सोपे आणि अगदी कमी वेळात होणारे आहे. त्यामुळे, जास्त मेहनत न घेता अगदी झटपट तयार करता येते. हिवाळ्यात (vegetable soup for winter) तुमच्या शरीराला आतून उबदार आणि निरोगी ठेवणाऱ्या या मिक्स व्हेज सूपची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. गाजर - १/२ कप (बारीक चिरलेले) २. बीटरुट - २ ते ३ (छोटे काप) ३. फ्लॉवर - १/२ कप (छोटे तुकडे केलेले) ४. हिरवे मटार - २ टेबलस्पून ५. बटाटा - १/२ कप (लहान फोडी करून घेतलेले) ६. कांदा - १ कप (बारीक चिरलेला) ७. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा (किसलेल आलं) ८. लसूण - २ पाकळ्या (बारीक चिरलेल्या) ९. मिरीपूड - १/२ टेबलस्पून १०. मीठ – चवीनुसार ११. साजूक तूप / बटर - १ टेबलस्पून १२. पाणी - २ कप १३. कोथिंबीर - १ टेबल स्पून (बारीक चिरलेली)
कृती :-
१. भाज्यांची तयारी :- सगळ्या भाज्या धुवून छोट्या बारीक तुकड्यांत चिरा. बटाटा अगदी बारीक चिरला तर सूपाला नैसर्गिक घट्टपणा येतो.
२. फोडणी :- कढईमध्ये साजूक तूप किंवा थोडं बटर गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं, लसूण घालून हलक्या आचेवर परता. ३. भाज्या शिजवणे :- आता गाजर, फ्लॉवर, मटार, बटाटा, बीट घाला. १ मिनिट हलकेच परता त्यात २ कप पाणी आणि मीठ घालून झाकण ठेवा. ७ ते ८ मिनिटांत भाज्या मऊ होतील.
जावित्रीचा चहा तुम्हाला थंडीतही ठेवतो सुपरफिट! चहा ‘असा’ करा आणि हिवाळ्यात लांब ठेवा सगळेच आजार...
४. ब्लेंड करणे :- हे संपूर्ण मिश्रण थोडं थंड होऊ द्या. मिक्सरमध्ये अर्धं मिश्रणच वाटा. म्हणजे सूपाचे टेक्श्चर मऊ, दाणेदार अशा दोन्ही प्रकारचे राहते, यामुळे सूप एकदम रेस्टॉरंटसारखंच लागतं. वाटलेलं मिश्रण आणि उरलेलं सूप एकत्र परत भांड्यात घाला.
५. सूप हलकेच गरम करणे :- आता मिरीपूड शिंपडा. गॅस मंद आचेवर ठेवा. १ ते २ मिनिटं उकळी आली की गॅस बंद करा.
६. सर्व्ह करताना :-
तयार गरमागरम सूप बाऊलमध्ये वाढा, वरून कोथिंबीर आणि आवडीनुसार एक थेंब तूप घालावं.
खास टिप्स...
• घसा दुखत असेल तर लसूण, आलं नक्की घाला, ऊब आणि आराम दोन्ही मिळेल. • सूप फार पातळ वाटलं तर १ चमचा बटाट्याची पेस्ट घातली की लगेच घट्ट व दाटसरपणा येतो. • मिरीपूड शेवटी टाकली तर सूपाचा सुगंध आणि चव अधिक उत्तम लागते. • लहान मुलांसाठी तिखट-मसाले कमी प्रमाणांत घाला आणि वरून लोण्याचा एक थेंब घाला.
१० मिनिटात पोटाला हलकं आणि घशाला आराम देणारं गरमागरम सूप पिण्यासाठी तयार आहे.
Web Summary : Enjoy warm mixed vegetable soup in winter for warmth and nutrition. This easy recipe boosts immunity, hydrates, and provides energy. Simple to make with carrots, beetroot, cauliflower, peas, potatoes, and spices for a healthy, comforting meal.
Web Summary : सर्दियों में गर्मी और पोषण के लिए गरमागरम मिक्स वेज सूप का आनंद लें। यह आसान रेसिपी प्रतिरक्षा को बढ़ाती है, हाइड्रेट करती है और ऊर्जा प्रदान करती है। गाजर, चुकंदर, फूलगोभी, मटर, आलू और मसालों के साथ बनाना आसान है, जो एक स्वस्थ और आरामदायक भोजन है।