हिवाळ्याचा ऋतू आला की बाजारात ताजे, हिरवेगार मटार दाणे भरपूर प्रमाणांत विकायला ठेवलेले दिसतात. गोडसर चव, पोषणमूल्ये आणि ताजेपणामुळे मटार हिवाळ्यातील खास भाजी मानली जाते. विकायला ठेवलेले हिरवेगार, ताजे, टपोरे मटार दाणे पाहून ते विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही. मटार दाण्यांचे एक ना अनेक असे असंख्य चविष्ट पदार्थ हिवाळ्यात हमखास घरोघरी केले जातात. मटार पुलाव, मटार उसळ, मटार कचोरी, मटार पराठा अशा (green peas puri recipe) मटारच्या प्रत्येक पदार्थाची चव खूप खास आणि उत्तम लागते. परंतु यंदाच्या थंडीत काहीतरी वेगळं म्हणून 'मटार पुरी' चा झक्कास बेत करुन पाहा. ही फक्त पुरी नसून एक हेल्दी पदार्थ आहे. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ, सुगंधी मसाल्यांची चव असलेल्या या पुऱ्या थंडीच्या दिवसांत शरीराला उब देतात आणि चवीला उत्तम लागतात(Winter Special Matar Masala Puri Recipe).
कमी साहित्यांत झटपट तयार होणारी ही रेसिपी सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत परफेक्ट ठरते. बाहेर गुलाबी थंडी आणि समोर ताटात जर हिरव्यागार मटारच्या गरमागरम आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या असतील, तर मग काही पहायलाच नको... हिवाळ्याच्या सीझनमध्ये मिळणाऱ्या गोडसर आणि ताज्या मटारची चव या पुऱ्यांमध्ये (matar masala puri winter recipe) अगदी अप्रतिम उतरते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची दाद मिळवणारी, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत 'मटार पुरी' तयार करण्याची अगदी सोपी आणि खास रेसिपी!
साहित्य :-
१. मटार - १ कप २. पाणी - गरजेनुसार३. कोथिंबीर - १ कप ४. लसूण पाकळ्या - ४ ते ८ पाकळ्या५. हिरव्या मिरच्या - ३ ते ५ मिरच्या ६. आलं - १ छोटा तुकडा७. जिरे - १ टेबलस्पून ८. गव्हाचे पीठ - १ कप ९. बेसन - १/२ कप १०. कलोंजी - १/२ टेबलस्पून ११. ओवा - १/२ टेबलस्पून १२. तीळ - १ टेबलस्पून १३. हिंग - चिमूटभर १४. धणेपूड - १/२ टेबलस्पून १५. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून १६. गरम मसाला - १/२ टेबलस्पून १७. मीठ - चवीनुसार१८. तेल - २ ते ३ टेबलस्पून
ताज्या, रसरशीत, रसाळ संत्र्यांची करा आंबट - गोड जेली! मुलांचा फेवरिट खाऊ - करताच होईल झटपट फस्त...
कृती :-
१. सगळ्यात आधी गरम पाण्यांत मटार दाणे घालून ते हलकेच वाफेवर उकळवून घ्यावेत. २. एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात उकडलेले मटार दाणे, कोथिंबीर, लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आलं, जिरे घालून मिश्रण वाटून त्याची थोडी जाडसर भरड तयार करून घ्यावी. २. मिक्सरमध्ये वाटून घेतलेली मटारची पेस्ट एका डिशमध्ये काढून त्यात गव्हाचे पीठ, बेसन, कलोंजी, ओवा, तीळ, हिंग, धणेपूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, तेल घालावे. सगळे जिन्नस कालवून एकत्रित करून गरजेनुसार थोडं - थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यावे.
३. मळून घेतलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. तयार गोळ्यांच्या छोट्या - छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. ४. गरम तेलात पुऱ्या सोडून हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात.
ताज्या, हिरव्यागार मटार दाण्यांच्या गरमागरम खुसखुशीत पुऱ्या खाण्यासाठी तयार आहेत. लोणचं, दही किंवा सॉस, चटणीसोबत या पुऱ्या खाण्याची मज्जाच वेगळी आहे.
Web Summary : This winter, try Matar Puri, a healthy and tasty alternative. Made with fresh green peas and spices, these crispy puris are perfect for breakfast or dinner. It's easy to make and sure to impress everyone.
Web Summary : इस सर्दी में, मटर पूरी आज़माएं, एक स्वस्थ और स्वादिष्ट विकल्प। ताज़ी हरी मटर और मसालों से बनी, ये कुरकुरी पूरियां नाश्ते या रात के खाने के लिए एकदम सही हैं। इसे बनाना आसान है और निश्चित रूप से हर कोई प्रभावित होगा।