Watermelon Eating Tips : उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव करण्यासाठी जास्तीत जास्त लोक कलिंगड खातात. कलिंगडासारखं रसाळ, गोड आणि हेल्दी फूड लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतं. कलिंगड खायला तर गोड लागतंच, सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात. कलिंगडात कॅलरी कमी असतात, सोबतच यात नॅचरल शुगरही असते. कलिंगड खाऊन तुम्ही शरीर हायड्रेट ठेवू शकता. यानं त्वचाही ग्लोइंग होते. मात्र, भरपूर लोक कलिंगड खाल्ल्यानंतर एक चूक करतात. ती म्हणजे लोक कलिंगड खाऊन झाल्यावर पाणी पितात. मात्र, आयुर्वेदात हे फळ खाल्ल्यानंतर पाणी पिण्यास मनाई करण्यात आली आहे. चला जाणून घेऊ यामागचं कारण...
कलिंगडातील पोषक तत्व
कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात लायकोपीन असतं. हे एक कॅरोटेनॉयड आहे, ज्यामुळे कलिंगडाचा रंग लाल होतो. यात अॅंटी-ऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे यातून शरीराला अनेक फायदे मिळतात. कलिंगड खाल्ल्यानं शरीरातील फ्री रॅडिकल्स बाहेर पडून शरीर डिटॉक्स होतं. यामुळे सेल्स डॅमेज होण्यापासून रोखल्या जातात. या फळामध्ये अनेक पोषक तत्व असतात जसे की, थायमिन, रायबोफ्लेविन, नियासिन, व्हिटॅमिन बी ६, फोलेट, पॅटोथेनिक अॅसिड, मॅग्नेशिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम इत्यादी.
कलिंगड खाल्ल्यावर पाणी का पिऊ नये?
कलिंगडामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. यात ९२ टक्के पाणी असतं. तसेच आपलं शरीर ७० टक्के पाण्यापासून बनलं आहे. अशात जर कलिंगड खाल्ल्यावर पाणी प्याल तर पोटात सूज येऊ शकते. आयुर्वेदानुसार, यामुळे तुमचं डायजेशन बिघडू शकतं. त्याशिवाय शरीरातील चक्राचंही संतुलन बिघडू शकतं. काही लोकांना कलिंगड खाल्ल्यावर अस्वस्थता जाणवू शकते. कलिंगड खाल्ल्यावर पाणी प्यायल्यास तुम्ही अॅसिडिटीसारखी समस्याही होऊ शकते.
कलिंगड खाल्ल्यावर किती वेळानं पाणी प्यावं?
कलिंगड खाल्ल्यानंतर काही वेळ पाणी पिणं टाळलं पाहिजे. ज्या लोकांचं डायजेशन कमजोर आहे, त्यांनी कलिंगड खाल्ल्यानंतर ४० ते ४५ मिनटांपर्यंत पाणी पिणं टाळावं. जर तहान लागलीच असेल तर कलिंगड खाल्ल्यावर कमीत कमी २० ते ३० मिनिटांनी पाणी प्यावं. जर जास्तच तहान लागली असेल तर एक-दोन घोट इतकंच पाणी प्यावं.
कशासोबत खाऊ नये कलिंगड?
आयुर्वेदानुसार दूध आणि कलिंगड हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. जर तुम्ही कलिंगड आणि दूध एकत्र खात असाल तर आरोग्य बिघडू शकतं. असं केलं तर डायजेशनसंबंधी समस्या होतील आणि सोबतच शरीरात विषारी पदार्थ तयार होतील. ज्यामुळे तुम्हाला उलटी होऊ शकते.
काही एक्सपर्ट्स सांगतात की, कोणंतही फळ खाल्ल्यानंतर एक तासांनंतर पाणी प्यावं. हा नियम अशा फळांवर लागू होतो, ज्यात पाणी भरपूर प्रमाणात असतं. जसे की, कलिंगड, स्ट्रॉबेरी, संत्री, खरबूज आणि काकडी.