मकर संक्रांतीनिमित्त होणारे हळदीकुंकू असो किंवा वाढदिवसाची छोटी पार्टी, स्टार्टर म्हणून व्हेज कटलेट्सला सर्वांचीच पसंती असते. संध्याकाळच्या चहासोबत गरमगारम व्हेज कटलेट खाण्याची मजाच वेगळी असते.(crispy veg cutlet) पण बऱ्याचदा कटलेट तळताना एक मोठी अडचण येते. ते तेलात फुटतात, जास्त तेल शोषून घेतात किंवा बाहेरुन कुरकुरीत न होता आतूनच मऊ पडतात. मेहनत घेऊन तयार केलेले कटलेट पॅनमध्ये टाकताच तुटले की सगळा मूडच खराब होतो.(veg cutlet recipe) खरं तर कटलेट फुटण्यामागे रेसिपीपेक्षा काही लहान पण महत्त्वाच्या चुका कारणीभूत असतात.(cutlet frying tips)पण अनेक गृहिणींची तक्रार असते की, कटलेट्स बनवून ठेवल्यानंतर काही वेळातच ते मऊ पडतात किंवा तळताना तेलात विरघळतात. जर तुम्हालाही हॉटेलसारखे 'परफेक्ट क्रिस्पी' कटलेट्स घरी बनवायचे असतील सोपी रेसिपी पाहा.
थंडीत करा ओव्याच्या पानांची कढी, पारंपरिक सोपी रेसिपी! मुलाचं पोट दुखणं आणि खोकलाही होईल कमी
साहित्य
उकडलेले मटार- ½ कप उकडलेले स्वीट कॉर्न- ½ कप फरसबी- ¼ कप शिमला मिरची- ¼ कप गाजर- ½ कप बारीक चिरलेले आले -1 tbsp बारीक चिरलेली हिरवी मिरची- 1 tbsp बारीक चिरलेली कोथिंबीर- ¼ कप उकडलेले बटाटे किसून 4–5 मध्यम रेड चिल्ली फ्लेक्स- १ चमचा जिरे पूड- ½ tsp आमचूर - १ चमचा काळी मिरी पूड - २ चमचे गरम मसाला पावडर - १ चमचा कॉर्न फलोर - १ चमचा भिजवलेले पोहे- ¾ कपमीठ चवीनुसार मैदा - 1/3 कपकॉर्न फ्लोअर - १ चमचा मीठ - चवीनुसारपाणी कोरडा मैदा गरजेप्रमाणे ब्रेड क्रम्ब्स तळण्यासाठी तेल
1. सगळ्यात आधी एका बाऊलमध्ये किसलेला बटाटा, मका, मटार, शिमला मिरची, फरसबी, गाजर, कोथिंबीर, आले, हिरवी मिरची, चिली फ्लेक्स, जिरे पूड, आमचूर, काळीमिरी पूड, गरम मसाला आणि मीठ घालून सर्व साहित्य मिक्स करा.
2. यात वरुन पोहे घालून पुन्हा मिश्रण एकजीव करा. त्यात कॉर्न फ्लोअरचे पीठ घालून पुन्हा एकजीव करुन घ्या.
3. आता हाताला तेल लावून मिश्रणाचे उभ्या आकारात गोळे बनवा. मैद्याच्या पिठात कॉर्न फ्लोअर, मीठ, काळी मिरी पूड आणि पाणी घालून पेस्ट तयार करा. यामध्ये तयार कटलेट डीप करुन घ्या. वरुन ब्रेड क्रम्ब्स लावा.
4. तेल कडकडीत गरम करुन तयार कटलेट तळून घ्या. कटलेट फुटण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे भाजीमध्ये असलेला ओलावा. बटाटा, गाजर, वाटाणे, बीन्स उकडल्यावर ते चांगले मॅश करून घ्यावेत आणि पूर्ण थंड करावेत. गरम किंवा पाणचट भाजी वापरली तर मिश्रण सैल होतं आणि तळताना कटलेट फुटतात.
5. कटलेट बांधण्यासाठी ब्रेडक्रम्ब्स, भाजलेला रवा किंवा कॉर्नफ्लोअरचा वापर करावा. यामुळे मिश्रण घट्ट राहतं आणि कटलेटला छान आकार मिळतो. फार कमी किंवा फार जास्त बांधणी केली तर कटलेट मऊ पडू शकतात.
6. खूप थंड तेलात कटलेट घातले तर ते तेल शोषून घेतात, तर खूप गरम तेलात टाकल्यास लगेच फुटू शकतात. मध्यम आंचे तेल गरम करूनच कटलेट सावकाश सोडावेत.
Web Summary : Avoid cutlets breaking/softening with these tips! This recipe ensures crispy, delicious veg cutlets every time, perfect as a party starter. Key is moisture control and correct frying temperature.
Web Summary : इन टिप्स से कटलेट को टूटने/नरम होने से बचाएं! यह रेसिपी हर बार क्रिस्पी, स्वादिष्ट वेज कटलेट सुनिश्चित करती है, जो पार्टी स्टार्टर के रूप में बिल्कुल सही है। नमी नियंत्रण और सही फ्राइंग तापमान महत्वपूर्ण है।