भारतीय स्वयंपाकघरात गुळाला विशेष महत्त्व आहे. साखरेपेक्षा आरोग्यदायी, नैसर्गिक आणि पारंपरिक गोडवा देणारा गूळ रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग.(jaggery storage tips) चहा, पुरणपोळी, आमटी किंवा सणासुदीला केले जाणारे पदार्थ, औषधी काढे. यामध्ये हमखास गूळाचा वापर केला जातो. पण अनेकदा गूळ जास्तीचा डब्यात साठवून ठेवतो.(how to store jaggery) ज्यामुळे तो काही दिवसांतच काळा पडतो, चिकट होतो किंवा त्याला पाणी सुटते. त्यामुळे गूळ खराब होतो, त्याची चव बदलते. ज्यामुळे फेकून देण्याशिवाय आपल्याकडे काही पर्याय नसतो. (jaggery turns black)पावसाळा किंवा हिवाळ्यात वातावरण थंड आणि दमट असते. अशावेळी गुळाची साठवण करणं जास्त कठीण असतं. बाजारातून कितीही चांगल्या दर्जेचा आणलेला गुळसुद्धा चुकीच्या पद्धतीने ठेवला तर लवकर खराब होतो. (jaggery releasing water) अनेकांना वाटतं की हा गुळाचा नैसर्गिक गुणधर्म आहे. पण चुकीच्या पद्धतीने साठवल्यास तो खराब होतो. योग्य पद्धतीने गूळ साठवला, तर तो महिनोमहिने नव्हे तर वर्षभरही तसाच ताजा, कोरडा आणि गोड राहू शकतो. पाहूया गूळ साठवण्याची सोपी ट्रिक.(keep jaggery fresh)
1. जर गूळ ओला किंवा चिकट झाला असेल तर तो आपण सूर्यप्रकाशात ठेवू शकतो. गुळातील ओलावा सुकवण्यासाठी हा चांगला पर्याय आहे. पूर्वीच्या काळापासून ही सोपी पद्धत वापरली जाते.
2. गुळातील ओलावा काढून टाकण्यासाठी सुकलेल्या कडुलिंबाची पाने देखील वापरली जाऊ शकतात. कडुलिंबाची पाने केवळ ओलावाच नाही तर जंतूंना देखील दूर ठेवण्यासाठी प्रभावी ठरु शकतात.
3. गूळ ओला किंवा काळा पडला असेल तर आपण यासाठी तांदळाचा देखील वापर करु शकतो. तांदूळ ओलावा शोषण्यास प्रभावी ठरतात. गुळातील ओलावा घालवण्यासाठी हा सोपा आणि चांगला पर्याय आहे.
4. गूळ साठवण्यासाठी कायम हवाबंद डब्याचा वापर करावा. काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्याचा आपण वापर करु शकतो. तसेच ओल्या हाताने किंवा चमच्याने गूळ हाताळू नका. हात पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच डब्यातून गूळ काढा. गूळ थंड, कोरड्या जागी साठवावा, फ्रीजमध्ये साठवू नका.
Web Summary : Jaggery often spoils due to improper storage, becoming sticky or watery. Sunlight, neem leaves, or rice can remove moisture. Store jaggery in airtight containers in a cool, dry place, avoiding wet hands or spoons for year-long freshness.
Web Summary : अनुचित भंडारण के कारण गुड़ अक्सर खराब हो जाता है, चिपचिपा या पानीदार हो जाता है। धूप, नीम की पत्तियां या चावल नमी को दूर कर सकते हैं। गुड़ को एयरटाइट कंटेनरों में ठंडी, सूखी जगह पर स्टोर करें, साल भर ताजगी के लिए गीले हाथों या चम्मचों से बचें।