Lemon Taste Reaction : लिंबू एक असं फळ आहे जे वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीने खाल्लं जातं. त्याचा रस प्यायला जातो. जेवण करताना भाजीवर टाकण्यासाठी, वेगवेगळ्या पदार्थांची टेस्ट वाढवण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो. बरेच चांगल्या पचनासाठी जेवण झाल्यावर लिंबावर मीठ लावून चाटतात. आपणही अनेकदा लिंबू खाल्लं असेल, तेव्हा लक्षात आलं असेल की, लिंबू खाताना डोळे आपोआप बंद होतात. पण असं का होतं याचा कधी विचार केला नसेल. ही समस्या नाही तर एक नॅचरल प्रतिक्रिया आहे. आंबट चव मेंदू आणि नसांवर असा परिणाम करते की, शरीर जराही वेळ न घालवता लगेच प्रतिक्रिया देतं. संशोधनानुसार, यामागे चव, नस आणि मेंदू हे काम एकत्र काम करत असतात.
लिंबू चाखल्यावर डोळे का बंद होतात?
संशोधनानुसार, जेव्हा लिंबाचा जीभेला स्पर्श होतो, तेव्हा त्यातील सिट्रिक अॅसिड आपल्या टेस्ट बड्सना तीव्र संकेत पाठवतं. हे संकेत ट्रायजेमिनल नर्व आणि फेशिअल नर्वच्या माध्यमातून थेट मेंदूपर्यंत पोहोचतात. ही अॅसिडिक उत्तेजना इतकी तीव्र असते की मेंदू तिला धोका किंवा अतिशय तीव्र उत्तेजक घटक म्हणून ओळखतो आणि शरीराला लगेच संरक्षणात्मक प्रतिक्रिया देण्याचा आदेश देतो. या प्रक्रियेत डोळे बंद होणं हा एक प्रोटेक्टिव रिफ्लेक्स मानला जातो. जसं लख्खं प्रकाश किंवा जोराच्या वाऱ्यात आपोआप डोळे मिटतात, तसंच आंबट चवीच्या तीव्रतेमुळे मेंदू काही क्षणांसाठी डोळे बंद करण्याचा संकेत देतो. यामुळे अचानक होणाऱ्या अस्वस्थ जाणिवेपासून आपले संरक्षण होते.
लिंबू चाखताच तोंडाला पाणी का सुटतं?
आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, लिंबू चाखताच तोंडाला पाणी सुटतं, हेदेखील याच प्रतिक्रियेचा भाग आहे. लिंबाच्या आंबट चवीमुळे लाळेच्या ग्रंथी अधिक सक्रिय होतात, जेणेकरून तोंडातील अॅसिड पातळ करता येईल. याच वेळी चेहऱ्याचे स्नायू आकसतात आणि डोळे बंद होतात, त्यामुळे संपूर्ण चेहरा एकत्रित प्रतिक्रिया देताना दिसतो. ही प्रतिक्रिया प्रत्येकामध्ये सारखी नसते. ज्यांच्या नसा अधिक संवेदनशील असतात, त्यांच्यात डोळे अधिक वेगाने आणि जास्त वेळ बंद होतात. लहान मुलांमध्ये हा रिफ्लेक्स अधिक स्पष्ट दिसून येतो, कारण त्यांची नर्व्हस सिस्टीम उत्तेजनांप्रती जास्त संवेदनशील असते.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, लिंबू किंवा कोणतीही अतिशय आंबट गोष्ट चाटताच डोळे बंद होणं ही काही विचित्र सवय नसून शरीराची हुशार आणि नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. यावरून दिसून येते की आपला मेंदू किती वेगाने चव, नस आणि स्नायूंमध्ये समन्वय साधून आपल्याला अस्वस्थ अनुभवापासून वाचवतो. त्यामुळे पुढच्यावेळी तुम्ही लिंबू चाखाल आणि डोळे आपोआप बंद झाले, तर समजून घ्या की तुमचे शरीर तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे.
