सकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक. आपल्या काहींना काही चटपटीत खावेसे वाटते. यात खमण ढोकळा हे नाव ऐकले तरी तोंडाला पाणी सुटते.(soft dhokla recipe) पिवळाधमक रंग, कापसासारखा मऊपणा आणि तोंडात टाकताच विरघळणारा जाळीदार ढोकळा. अनेकदा आपण बाजारातून ढोकळा आणतो, कारण घरी बनवलेला ढोकळा नीट फुलत नाही, मध्येच तो बसतो किंवा चिवट असतो.(spongy dhokla) कधीकधी सोडा जास्त झाल्यावर त्याला लाल रंग येतो, तर कधी तो घशात अडकल्यासारखा कोरडा लागतो. (perfect dhokla tips)
मार्केटमध्ये मिळणारा परफेक्ट ज्युसी आणि स्पंजसारखा ढोकळा बनवणं काही अवघड नाही. फक्त काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर घरच्या घरी अगदी ३० मिनिटांत मार्केटसारखा ढोकळा तयार करू शकता. जाणून घेऊया मऊशार ढोकळ्याची खास रेसिपी.
Best summer dresses : ऑफिस वेअरसाठी बांधनी ड्रेसचे ५ पॅटर्न, कलरफुल स्मार्ट लूक-कूल स्टाइल
साहित्य
तेल - ३ मोठे चमचे
पिठी साखर - ३ मोठे चमचे
लिंबू सत्व - १ १/२ छोटा चमचा
हिंग - १/४ छोटा चमचा
हळद - १/४ छोटा चमचा
पाणी - ३ मोठे चमचे
बेसन - १ १/२ कप
पाणी - ३/४ कप
सोडा - १ १/४ छोटा चमचा
फोडणी करीता
मोहरी - १ छोटा चमचा
तेल - ३ चमचे
कढीपत्ता - १० ते १५ पाने
हिरवी मिरची - ३/४
कोथिंबीर - सजावण्यासाठी
पाणी - १ १/४ कप
साखर - १ १/४ मोठा चमचा
मीठ - गरजेनुसार
कृती
1. एका मिक्सरच्या जारमध्ये तेल, पिठीसाखर, लिंबू सत्व , हिंग, हळद आणि पाणी घ्या. हे सर्व साहित्य नीट वाटून घ्या. आता त्यात बेसन आणि थोडे पाणी घालून पुन्हा काही वेळ मिक्सरमधून फिरवून घ्या.
2. ढोकळ्याच्या ट्रेला थोडे तेल लावून ग्रीस करा आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळायला लागले की, तयार बेसनाच्या मिश्रणात बेकिंग सोडा घाला. फक्त ५-१० सेकंदांसाठी बॅटर पुन्हा मिक्सरमधून फिरवा.
3. हे तयार मिश्रण तेल लावलेल्या ट्रेमध्ये ओता. हा ट्रे स्टीमरमध्ये ठेवा आणि १५ ते २० मिनिटे वाफवून घ्या.
4. १५ ते २० मिनिटांनंतर, टूथपिकच्या साहाय्याने ढोकळा शिजला आहे का ते तपासा. जर टूथपिक स्वच्छ बाहेर आली, तर याचा अर्थ ढोकळा पूर्णपणे शिजला आहे. ढोकळा बाहेर काढा आणि तो पूर्णपणे थंड होऊ द्या.
5. आता लहान पॅनमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि तीळ घाला. फोडणीत थोडे पाणी, मीठ आणि साखर घालून २-३ मिनिटे उकळा.
6. ढोकळ्याचे लहान तुकडे करा. तयार फोडणीचे पाणी ढोकळ्यावर सर्वत्र ओता. वरुन बारीक चिरलेल्या ताज्या कोथिंबिरीने सजवा.
