Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट

फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट

cauliflower cooking tips: cauliflower recipe mistakes: how to cook cauliflower:आपलीही भाजीही बेचव होत असेल, तर शिजवताना या ५ सामान्य चुका करणं टाळा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2026 10:00 IST2026-01-09T10:00:13+5:302026-01-09T10:00:40+5:30

cauliflower cooking tips: cauliflower recipe mistakes: how to cook cauliflower:आपलीही भाजीही बेचव होत असेल, तर शिजवताना या ५ सामान्य चुका करणं टाळा.

why cauliflower curry doesn’t taste good common mistakes while cooking cauliflower how to make cauliflower curry tasty like home cauliflower sabzi cooking tips Indian style | फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट

फ्लॉवरच्या भाजीला आईच्या हातासारखी चव येत नाही? शिजवताना ५ चुका टाळा, फ्लॉवर लागेल चविष्ट

आपण बनवलेल्या पदार्थ इतका चविष्ट का होत नाही असा प्रश्न आपल्याला कायमच पडतो. आईने केलेला कोणताही पदार्थ चविष्ट लागतो. अगदी तेच साहित्य, तेच मसाले वापरुनही फ्लॉवरची भाजी घरी तशीच का होत नाही, असा अनुभव बहुतेकांनी घेतला असेल.(cauliflower cooking tips) कधी भाजीत मीठच कमी पडते, तेल जास्त होते, मसाले करपतात किंवा भाजीची चव व्यवस्थित लागत नाही. सतत जिभेवर फ्लॉवरचा कडवटपणा रेंगाळत राहतो. खरं तर चव न येण्यामागे मोठं कारण नसून स्वयंपाकघरातील काही छोट्या चुका असतात.(cauliflower recipe mistakes) या चुका वेळेत टाळल्या तर साधी फ्लॉवरची भाजीसुद्धा खमंग, मसालेदार आणि चविष्ट होते.
आईने बनवलेल्या फ्लॉवरच्या भाजीची चव काही वेगळीच असते. मसालेदार, सुटसुटीत आणि चविष्ट. अनेकदा आपण प्रयत्न करतो, पण आपली भाजी एकतर खूप मऊ होते किंवा मसाल्यांची चव त्यात नीट उतरत नाही. जर आपलीही भाजीही बेचव होत असेल, तर शिजवताना या ५ सामान्य चुका करणं टाळा. 

स्वयंपाकघरातील ४ गोष्टी ठरतील 'स्लीपिंग पिल्स'पेक्षाही भारी, लागेल शांत झोप आणि वाटेल फ्रेश

1. फ्लॉवरची भाजी बनवताना अनेकजण गरम पाण्याने धुत नाही. यात बारीक अळ्या किंवा कीडे असतात. जे आपल्याला दिसत नाही. त्यासाठी फ्लॉवरचे तुकडे करुन ५ ते १० मिनिटे कोमट पाण्यात थोडे मीठ आणि हळद घालून ठेवा. ज्यामुळे त्याचा उग्र वास निघून जाईल. 

2. फ्लॉवरची भाजी शिजवण्यासाठी पाण्याचा वापर करु नका. यामुळे त्याची चव बदलते. रस्सा भाजी करताना फ्लॉवर सगळ्यात शेवटी घाला. ज्यामुळे तिचा कुरकुरीतपणा टिकून राहिल. 

3. फ्लॉवर तेलावर व्यवस्थित परतल्यानंतर मगच मसाले घाला. अनेकदा मसाल्यांचे प्रमाण आणि वेळ खूप महत्त्वाची असते. घाईघाईत कच्चे मसाले वापरल्याने भाजीला हवा तसा स्वाद येत नाही. फोडणी देताना जिरे, हिंग आणि कढीपत्त्याचा वापर नक्की करा. मसाला तेलात चांगला परतून घ्या. यात योग्य प्रकारे धणे पूड आणि गरम मसाला घातल्यास भाजीला चव येते. 

4. रस्सा भाजी करताना मसाले शिजण्यापूर्वी पाणी घालू नका. यामुळे फ्लॉवरला मसाल्यांचा थर बसत नाही. भाजी बनवण्यापूर्वी फ्लॉवरचे तुकडे तेल किंवा तुपात २ ते ३ मिनिटे परतून घ्या. यामुळे भाजीला खमंग चव येते. 

5. अनेकदा भाजीची चव गोड लागते. अशावेळी फ्लॉवरच्या रस्सा भाजीत कांद्यासोबत टोमॅटोची प्युरी किंवा दही घाला. ज्यामुळे रस्सा दाट होईल आणि चवही छान लागेल. 
 

Web Title : माँ जैसी स्वादिष्ट फूलगोभी बनाएँ: ये 5 खाना पकाने की गलतियाँ न करें।

Web Summary : स्वादिष्ट फूलगोभी चाहते हैं? इसे धोना न छोड़ें, पकाते समय पानी से बचें, मसालों को अच्छी तरह भूनें, फूलगोभी को अलग से भूनें और टमाटर या दही से मिठास को संतुलित करें।

Web Title : Make delicious cauliflower like mom: Avoid these 5 cooking mistakes.

Web Summary : Want tastier cauliflower? Don't skip washing it, avoid water while cooking, roast spices well, sauté cauliflower separately, and balance sweetness with tomato or yogurt.