जेवणाच्या ताटात जर डाळ - भात असेल, तरच ते जेवण परिपूर्ण वाटतं. पण रोजची तीच ती साधी डाळ, वरण, आमटी खाऊन बरेचदा कंटाळा येतो. घरच्याघरीच बनवलेली साधी डाळ जरी पौष्टिक असली तरी कधी कधी हॉटेलसारखी चटपटीत आणि चमचमीत डाळ खाण्याची इच्छा होतेच. आपण नेहमी तूर, मसूर अशा वेगवेगळ्या डाळी खातोच...या डाळींबरोबरच हिरवा मूग देखील आपल्या आरोग्यासाठी तितकाच पौष्टिक आणि फायदेशीर असतो. हिरवा मूग आरोग्यासाठी उत्तम मानला जातो, पण अनेकांना त्याची चव फारशी आवडत नाही. अशावेळी याच हिरव्या मुगाच्या डाळीला झणझणीत तडका देऊन आपण अगदी हॉटेलसारखी चटपटीत, चमचमीत पौष्टिक मुगाची डाळ करु शकतो(Sabut Moong Dal Recipe)
हॉटेलमध्ये गेल्यावर आपण जशी 'दाल तडका' किंवा 'दाल फ्राय' आवडीने मागवतो, तशाच चवीची पौष्टिक हिरव्या मुगाची डाळ देखील चवीला अप्रतिम लागते. योग्य मसाल्यांचा वापर आणि वरून दिलेल्या खमंग तडक्यामुळे ही डाळ इतकी चविष्ट होते की, घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण बोटं (Whole Moong Dal Curry) चाटत खातील. हलकी, पचायला सोपी आणि तरीही तिखट-चवदार अशी ही डाळ जेवणाची रंगतच वाढवते. हॉटेलसारखा दाटसरपणा, खमंग मसाल्यांचा योग्य वापर आणि वरून लाल मिरचीचा खमंग तडका यामुळे ही डाळ भातासोबतच नाही, तर गरम फुलक्यांसोबतही छान लागते. स्वयंपाकघरात उपलब्ध (Green Moong Curry) असलेल्या साहित्यातून हॉटेलसारख्याच चवीची चटपटीत खमंग पौष्टिक हिरव्या मुगाची डाळ कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरवी मूग डाळ - १ कप (५ ते ६ तास पाण्यांत भिजवलेली)२. हिरवी छोटी वेलीची - २ ते ३३. दालचिनी - १ छोटा तुकडा४. तमालपत्र - १ ५. काळीमिरी - ३ ते ४ दाणे ६. लवंग - ३ ते ४ काड्या ७. मीठ - चवीनुसार८. पाणी - गरजेनुसार९. तेल - ३ ते ४ टेबलस्पून १०. साजूक तूप - १ टेबलस्पून ११. जिरे - १ टेबलस्पून १२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१३. लसूण - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेला)१४. हिरव्या मिरच्या - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)१५. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेल)१६. हिंग - चिमूटभर१७. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून१८. धणेपूड - १ टेबलस्पून १९. हळद - १ टेबलस्पून२०. दही - १२/ कप २१. कसुरी मेथी - १/२ टेबलस्पून२२. बटर - १/२ टेबलस्पून२३. गरम मसाला - १/२ टेबलस्पून२४. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
विकतसारखी लालचुटुक, चमचमीत पावभाजी करण्यासाठी ७ टिप्स! पोटभर पावभाजी खाण्याचा लुटा मनमुराद आनंद...
कृती :-
१. सगळ्यात आधी हिरवी मूग डाळ पाण्याने स्वच्छ धुवून ती पाण्यांत ६ ते ७ तासांसाठी व्यवस्थित भिजवून घ्यावी. २. मग प्रेशरकुकरमध्ये भिजवलेली हिरवी मुगाची डाळ घालून त्यासोबतच हिरवी छोटी वेलीची, दालचिनी, तमालपत्र, काळीमिरी, लवंग काड्या, चवीनुसार मीठ व गरजेनुसार पाणी घालून असे सगळे जिन्नस घालूंन किमान ३ ते ४ शिट्ट्या काढून डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. ३. आता एका मोठ्या भांड्यात थोडंसं तेल आणि साजूक तूप घालून ते गरम करावं. मग यात फोडणीसाठी जिरे, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला लसूण, हिरव्या मिरच्या, आलं, चिमूटभर हिंग, लाल तिखट मसाला, धणेपूड, हळद घालावी.
४. मग थोडं पाणी घालून ग्रेव्ही थोडी पातळ करून घ्यावी. मग या मिश्रणात फेटलेलं दही घालावं आणि सगळं मिश्रण कालवून घ्यावं. ५. त्यानंतर या मिश्रणात शिजवून घेतलेली हिरवी मूग डाळ घालावी. मग एक हलकीशी उकळी काढून घ्यावी. ६. मग या तयार डाळीत कसुरी मेथी, बटर, गरम मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
हिरव्या मुगाची चटपटीत, चमचमीत हॉटेल स्टाईल डाळ खाण्यासाठी तयार आहे. आपण ही डाळ गरमागरम चपाती, भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत देखील खाऊ शकता.
Web Summary : Transform your meal with this flavorful green moong dal recipe. Packed with nutrients and easy to digest, this dish elevates your dining experience with its rich taste and aroma. Enjoy this hotel-style dal with rice or roti for a satisfying meal.
Web Summary : इस स्वादिष्ट हरी मूंग दाल रेसिपी के साथ अपने भोजन को रूपांतरित करें। पोषक तत्वों से भरपूर और पचाने में आसान, यह व्यंजन अपने समृद्ध स्वाद और सुगंध के साथ आपके भोजन के अनुभव को बढ़ाता है। एक संतोषजनक भोजन के लिए चावल या रोटी के साथ इस होटल-शैली की दाल का आनंद लें।