Join us

'डाएट केलं तरी चहाचं व्यसन सुटत नाही..', जया किशोरींना आवडतो 'असा' चहा, फक्कड चहा करण्याची सोपी ट्रिक, होईल मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2025 13:33 IST

Healthy tea recipe: Tea craving during diet: Jaya Kishori prefers this type of tea: सगळ्यात चांगला चहा कसा बनवायचा याविषयी जया किशोरींनी सांगितलं.

चहा हे फक्त पेय नाही तर अनेकांसाठी अमृत आहे. सकाळच्या दिवसाची सुरुवात ते रात्री झोपेपर्यंत अनेकजण चहा पितात. (Healthy tea recipe)दिवसाची सुरुवात असो, कामातून मिळालेला छोटा ब्रेक असो किंवा संध्याकाळचा आळस दूर करायचा असो.(Tea craving during diet)  चहा हा अनेकांना हवाच असतो. जीवघेणी डोकेदुखी, वैताग आला किंवा कामातून फ्रेश वाटावे यासाठी चहा हा गरजेचाच. (Jaya Kishori prefers this type of tea) डाएट सुरु केलं तर सर्वात आधी सल्ला दिला जातो तो चहा कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा पण असं करणं खरंतर अनेकांना शक्य होत नाही. (Easy tea recipe) असाच अनुभव सांगितला तो जया किशोरी यांनी. (Tea hacks India)जया किशोरी या आध्यात्मिक प्रवक्ता म्हणून ओळखल्या जातात. त्या प्रसिद्ध कथाकार आणि प्रेरक वक्ता म्हणूनही ओळखल्या जातात. नुकतेच जया किशोरी भारती सिंग आणि हर्षच्या पॉडकास्टमध्ये दिसल्या होत्या. जिथे त्यांनी काही आपल्या आवडी-निवडी शेअर केल्या. (Special tea by Jaya Kishori)

'धर्मेंद्र तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही', डिंपल कपाडियांनी हेमा मालिनींना स्पष्ट सांगितलेलं; म्हणाल्या, 'तू विचार..'

त्यांनी पॉडकास्टमध्ये सांगितलं मीही डाएट करुन पाहिलं. पण मी संध्याकाळचा दुधाचा चहा सोडू शकत नाही. यापलीकडे काहीच नाही. याचा अर्थ असा की जया किशोरी यांना दुधाचा चहा प्यायला आवडतो. चहा हा त्यांच्या आवडीचे पेय. सगळ्यात चांगला चहा कसा बनवायचा याविषयी त्यांनी सांगितलं. 

शेफ संजीव कपूर सांगतात की चहाचा खरा स्वाद घ्यायचा असेल तर पाण्यात दूध टाकल्यानंतर चहा पावडर घालू नका. सगळ्यात आधी पाणी घाला, नंतर आले, लवंग, वेलची आणि मग चहा पावडर घाला. त्यांनंतर व्यवस्थित उकळवून घ्या. पुन्हा थोडे दूध घालून उकळवा.  शेफ रणवीर ब्रार सांगतात की त्यांचे वडील जगातील सगळ्यात टेस्टी चहा बनवतात. ही रेसिपी ते कोणासोबतही शेअर करत नाही. यात ते ज्येष्ठमध, बडीशेप आणि दोन वेळा दूध घालतात. जया किशोरी सांगतात चहा हे पेय शरीराला हलक करण्यास मदत करते, पचन सुधारते आणि दिवसभराचा आळस दूर करतो. फक्कड चहा करण्यासाठी काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर चवही छान लागेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jaya Kishori's tea addiction despite diet; easy tea recipe revealed.

Web Summary : Jaya Kishori admits struggling to quit evening milk tea during her diet. She shared her love for tea. Chefs suggest adding spices before tea powder for flavor. Tea helps digestion and removes laziness.
टॅग्स :अन्नपाककृती