Lokmat Sakhi >Food > मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...

Walnut Halwa : Akhrot Ka Halwa : Walnut Halwa Recipe : Akrodcha Halwa Recipe : How To Make Walnut Halwa At Home : गणपती बाप्पांचा नैवेद्य तसेच प्रसादासाठी करा साजूक तुपातील गोडधोड अक्रोडचा हलवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2025 14:24 IST2025-08-28T12:42:19+5:302025-08-28T14:24:48+5:30

Walnut Halwa : Akhrot Ka Halwa : Walnut Halwa Recipe : Akrodcha Halwa Recipe : How To Make Walnut Halwa At Home : गणपती बाप्पांचा नैवेद्य तसेच प्रसादासाठी करा साजूक तुपातील गोडधोड अक्रोडचा हलवा...

Walnut Halwa Akhrot Ka Halwa Walnut Halwa Recipe Akrodcha Halwa Recipe How To Make Walnut Halwa At Home | मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त...

आत्तापर्यंत सगळ्यांच्याच घरी गणपती बाप्पांचे आगमग अगदी उत्साहात व जल्लोषात झाले असेलच. आता इथून पुढे दहा दिवस गणपती बाप्पांसाठी त्यांच्या आवडीचे वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ हमखास घरोघरी केले जातात. बाप्पासाठी नैवेद्य आणि प्रसाद म्हणून मोदक तर केले जातातच, परंतु त्यासोबतच इतरही गोडाधोडाच्या पदार्थांची विशेष रेलचेल असते(How To Make Walnut Halwa At Home).

बाप्पाला नैवेद्य आणि प्रसाद म्हणून गोडाच्या पदार्थात नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करायचा बेत असेल तर, अक्रोडचा हलवा हा एक उत्तम पर्याय आहे. अक्रोडाचा (Akhrot Ka Halwa) पौष्टिकपणा, तुपाचा सुगंध आणि गोड चव यामुळे हा हलवा फक्त स्वादिष्टच नव्हे तर आरोग्यदायीही ठरतो. अगदी कमी साहित्यात झटपट तयार होणारा हा साजूक तुपातील अक्रोडचा(Walnut Halwa Recipe)हलवा चवीला अप्रतिम लागतो. गणपती बाप्पांच्या (Walnut Halwa) नैवेद्यासाठी खास चविष्ट असा साजूक तुपातील गोडधोड अक्रोडचा हलवा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात.  

साहित्य :- 

१. अक्रोड - २०० ग्रॅम
२. दूध - १ + १/२ कप 
३. साखर - १/२ कप 
४. साजूक तूप - १/४ कप 
५. खवा - १/२ कप 
६. मिल्क पावडर - १ टेबलस्पून
७. वेलची पूड - १ टेबलस्पून  

इडली पात्रात करा मऊसूत इन्स्टंट रवा मोदक! बाप्पाचा प्रसाद आणि नैवेद्य होईल खास - पाहा इन्स्टंट रेसिपी... 


डाएटिशियन ऋजुता दिवेकर सांगतात ५ पावरफुल फूड कॉम्बिनेशन! वजन होईल कमी - रहाल कायम फिट... 

कृती : -

१. अक्रोड मिक्सरमध्ये फिरवून त्याची थोडी जाडसर अशी भरड करुन घ्यावी. (अक्रोडची एकदम बारीक पूड करु नये.) 
२. एका पॅनमध्ये साजूक तूप घेऊन त्यात अक्रोडची मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली जाडसर भरड घालावी. 
३. साजूक तुपामध्ये अक्रोडची भरड हलकासा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यावी.
४. मग या भाजून घेतलेल्या अक्रोडाच्या मिश्रणात थोडासा फ्रेश खवा आणि मिल्क पावडर घालावी. हे मिश्रण मंद आचेवर २ ते ३ मिनिटे भाजून घ्यावे. 

सणावाराला भरपूर खाणं होत ? ओव्हरइटिंगचा त्रास, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ५ टिप्स - 'अशी' घ्या तब्येतीची काळजी...

५. आता या मिश्रणात दूध घालावे. दूध घालून मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून मिश्रण ५०% घट्ट व दाटसर होईपर्यंत आटवून घ्यावे. 
६. मिश्रण थोडे आटत आल्यावर त्यात साखर घालून पुन्हा एकदा मिश्रण कालवून घ्यावे. 
७. मग त्यावर झाकण घेऊन हलवा व्यवस्थित शिजवून घ्यावा. हलवा थोडा घट्ट आणि दाटसर होत आल्यावर त्यात वेलची पूड घालावी. 
८. हलवा मंद आचेवर थोडा दाटसर होईपर्यंत अधून - मधून चमच्याने हलवून शिजवून घ्यावा. 

गणपती बाप्पांच्या नैवेद्य तसेच प्रसादासाठी मस्त असा साजूक तुपातील गोडधोड अक्रोडचा हलवा खाण्यासाठी तयार आहे.

Web Title: Walnut Halwa Akhrot Ka Halwa Walnut Halwa Recipe Akrodcha Halwa Recipe How To Make Walnut Halwa At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.