डार्लिंग-डार्लिंग दिल क्यों तोडा, पी लो आलम सोडा! या एकाच डायलॉगने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रील्स, मीम्स, शॉर्ट्समध्ये सतत ऐकू येतो.(Dhurandar movie milk soda) हा संवाद अर्थात धुरंधर सिनेमातला खास क्षण. पण या डायलॉगपेक्षा जास्त कुतूहल निर्माण केलं आहे ते त्यात दाखवलेल्या दूध सोडा या विचित्र वाटणाऱ्या पेयाने. दूध आणि सोडा? हे कॉम्बिनेशन ऐकून आपल्या सर्वांनाच प्रश्न पडला असेल. हा नेमका प्रकार काय आहे? (milk soda viral drink)
दूध हे पेय सकाळचा नाश्ता, आरोग्य किंवा झोपेआधीचं पेय म्हणून पितो. तर सोडा हा पोटासाठी, उन्हाळ्यात थंडावा देणारा किंवा ड्रिंक्समध्ये वापरला जाणारा घटक. पण धुरंधर चित्रपटात या दोघांचंही कॉम्बिनेशन दाखवण्यात आलं. जो पाहताच क्षणी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतो. सिनेमातला हा सीन पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली, “हे खरंच प्यायचं असतं का?”, “चव कशी असते?”
भारत आणि पाकिस्तानच्या अनेक भागात वापरला जातो. दूध आणि सोडाचे मिश्रण आपल्याला विचित्र वाटेल, पण काही लोक हे खूप आवडीने पितात. हा दूध सोडा कसा बनवला जातो, याची रेसिपी पाहूया.
सगळ्यात आधी आपल्याला मोठ्या पॅनमध्ये दूध गरम करावे लागेल. थोडी साखर घालून विरघळवून घ्या. आता एका ग्लासमध्ये बर्फ घाला.त्यात साखरेचे थंड दूध घाला. वरुन सोडा घाला. यावर लिंब किसून घालता येईल. हवं तर आपण यात आपल्या आवडीचा सोडा देखील घालू शकतो. पण सोडा निवडताना काळजी घ्या, ज्यामुळे आपल्याला त्रास होणार नाही.
उत्तर भारत आणि पंजाबमध्ये हे पेय लोकप्रिय आहे. तर काही संशोधनानुसार दुधाच्या सोड्याची कल्पना व्हिक्टोरियन इंग्लंडमध्ये आली. त्या ठिकाणी दूध आणि सोडा हे आरोग्यासाठी चांगले पेय मानले जायचे. प्रत्येक भागात वेगवेगळे प्रयोग केले जातात. तर काही लोक दुधात मिसळून रुहअफ्जा देखील पितात.
