Join us  

आधी काट्याचमच्यानं नंतर हातानं खाल्ला मसाला डोसा; ब्रिटिश उच्च आयुक्तांची पोस्ट व्हायरल, ट्विटरवर मसालेदार दंगा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2021 4:17 PM

Viral Masala dosa : ब्रिटिश उच्च आयुक्त अॅलेक्स एलिस यांनी पहिल्यांदाच मैसूर मसाला डोसा खाऊन पाहिला अन् आपली प्रतिक्रिया दिली

ठळक मुद्देआधी ते काट्याच्या चमच्यानं खाण्याचा प्रयत्न करतात. मग मोबाईलमध्ये पाहात चमचे बाजूला ठेवून हातानं मसाला डोसा खाताना व्हिडीओमध्ये दिसून येतील.

भारतीय पदार्थ  हातानेच खावेत की काटा चमच्यानं यावरून अनेकदा चर्चा होताना तुम्ही पाहिल्या असतील. हॉटेलात गेल्यानंतर मेंदूवडा, इटली,  डोसा अनेक भारतीय पदार्थ लोक काट्याच्या चमच्यानं खातात. काहीवेळा असं खाण्यासाठी खूप कष्ट पडतात पण त्यांचा अट्टहास काही मागे हटत नाही. आहार तज्ज्ञांच्यामते काट्याच्या चमच्यानं खाण्यापेक्षा घास घेतांना पाचही बोटांचा वापर करावा. कारण हातानं खाणं शरीरासाठी फायद्याचं ठरतं. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

ब्रिटिश उच्च आयुक्त अॅलेक्स एलिस यांनी पहिल्यांदाच मैसूर मसाला डोसा खाऊन पाहिला अन् आपली प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावर ही प्रतिक्रिया तुफान व्हायरल होत आहे. त्यांनी बुधवारी त्यांच्या पहिल्या बेंगळुरू भेटीच्या निमित्ताने ट्विटर हँडलवर ही माहिती पोस्ट केली अन् पाहता पाहता हे ट्विट वेगानं व्हायरल झालं.

ब्रिटिश उच्च आयुक्तांचे मसाला डोश्याचा आनंद घेतानाचे फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.  Delicious  #MysuruMasalaDosa!! A great way to begin my first visit to #Bengaluru अस कॅप्शन त्यांनी ट्विटवर शेअर केलेल्या फोटोला दिलं आहे.

हे ट्विट व्हायरल झाल्यानंतर डोसा कसा वेगवेगळ्या पद्धतीनं खाता येतो याचे ट्विट्सही व्हायरल झाले. जास्तीत जास्त उत्तरांमध्ये डोसा हा  हातानं खायला हवा असं म्हटलं होतं. हातानं खाल्ल्यामुळे डोश्याची चव आणखी वाढते असा आशयाच्या कमेंट्स लोकांनी केल्या आहेत.

एका ट्विट युजरनं, 'श्रीमान एलेक्स आपण हातानं डोसा खायला हवा.' असं म्हटलंय. आणखी एका युजरनं 'डोसा  हा एक कुरकुरीत पदार्थ असून काट्यानं खाणं उत्तम ठरणार नाही.  बँगलोरमध्ये आपलं स्वागत आहे.' अशा शब्दात उत्तर दिलंय. दक्षिण भारतीय पदार्थ खाण्यासाठी कटलरीचा उपयोग केला म्हणून लोक त्यांना ट्रोल करतील असं अनेकांना वाटलं. 

ब्रिटिश उच्च आयुक्त अॅलेक्स एलिस यांनी मला डोसा कसा खावा याचं उत्तर लोकांकडून मिळाल्याचं नमुद केलं.  ते गुरूवारी चांगल्या मूडमध्ये होते त्याचवेळी त्यांनी आपल्या हातांनी डोसा खातानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ट्विटर ९२ % योग्य असल्याचं म्हणत हातानं डोश्याचा जास्त आनंद घेता येतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आधी ते काट्याच्या चमच्यानं खाण्याचा प्रयत्न करतात. मग मोबाईलमध्ये पाहात चमचे बाजूला ठेवून हातानं मसाला डोसा खाताना व्हिडीओमध्ये दिसून येतील.

टॅग्स :हेल्थ टिप्सअन्नसोशल व्हायरलव्हायरल फोटोज्