Join us

Viral Food Combination : इडली ६५, मेदूवडा बर्गर, दाल मखनी पुचका असे पदार्थ खरंच असतात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:53 IST

Viral Food Combination : समाजमाध्यमात अनेक अतरंगी पदार्थ व्हायरल असतात. त्यांना कुणी नावं ठेवते कुणी कौतुक करते. पण एखाद्या हॉटेलातही असे पदार्थ मिळू लागले तर..

सध्या लोकांमध्ये पिझ्झा पुरणपोळी, नुडल्स आईस्क्रिम, समोसा शेक, गुलाबजामून पराठा असा विचित्र फूड कॉम्बिनेशन्सची क्रेझ खूप पाहायला मिळतेय सोशल मीडियावर रोज नवीन रेसेपीज नवीन पदार्थांचे कॉम्बिनेशन्स व्हायरल होत असतात. लोक वाट्टेल ते करतात, म्हणून त्यांना नावंही ठेवली जातात. मॅगी आईस्क्रीम, पेस्ट्री भजी इथपासून ते गुलाबजाम पराठा पर्यंत. हे सारे फक्त व्हायरलसाठी होते की खरंच असे पदार्थ कुणी करुन खाते यावर चर्चा होते. मात्र असे पदार्थ सहसा हॉटेलात मिळत नाहीत. मात्र आता काही वेगळेच पदार्थ आता विलेपार्ल पूर्व आणि गोरेगाव येथील क्रेव्ह द मल्टीपल कजिन्स या रेस्टॉरंटमध्ये ही मिळतात, असं व्हायर पोस्ट सांगतात. (Medu vada burger idli 65 more fusion foods await you at the new krave)

दाल मखनी पुचका, बिर्यानी एरासिटी बॉल्स, इडली ६५, पिझ्झा डोसा, मेदू वडा बर्गर, खो सुए इडली,  असे वेगवेगळे पदार्थ आणि त्यांची सध्या चर्चा आहे. 

 

टॅग्स :अन्नसोशल व्हायरल