Join us

अस्सल पारंपरिक चवीचा चमचमीत वांगी भात! करायला सोपा, चव भन्नाट - खा पोटभर मन होईल तृप्त...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2025 14:36 IST

Vangi Masale Bhat : How To Make Brinjal Rice : Vangi Bhat : Vangi Bhat Maharashtrian style : महाराष्ट्रातील काही भागात लग्नाच्या पंगतीत किंवा खास प्रसंगी तसेच सणावाराला आवर्जून हा वांगी भात केला जातो.

भारतीय थाळीमध्ये भाताला विशेष महत्व असते. आपल्याकडे नेहमीच्या जेवणात पांढऱ्याशुभ्र भातासोबतच, वेगवेगळ्या प्रकारचा देखील भात केला जातो. पुलाव भात, मसाले भात, याप्रमाणेच वांगी भात देखील असाच एका फार लोकप्रिय पदार्थ. वांगी भात हा एक पारंपरिक आणि चविष्ट पदार्थ आहे जो कमी वेळात (Vangi Masale Bhat) आणि कमी साहित्यात पटकन तयार होतो. वांग्याची रस्सा भाजी, वांग्याचे भरीत, भरली वांगी असे वांग्याचे अनेक पदार्थ आपण खातो, परंतु वांगी भाताची (How To Make Brinjal Rice) चवचं न्यारी... मसाल्याचा झणझणीतपणा आणि वांग्याची चव यांचा छान (Vangi Bhat) मिलाफ झालेला वांगी भात फक्त पोटच भरत नाही तर वांगी भात खाऊन मन देखील तृप्त होते(Vangi Bhat Maharashtrian style).

कमी वेळात तयार होणारा हा वांगी भात दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी परफेक्ट पर्याय आहे. महाराष्ट्रातील काही भागात लग्नाच्या पंगतीत किंवा  खास प्रसंगी तसेच सणावाराला आवर्जून हा वांगी भात केला जातो. यंदाच्या गणेशोत्सवात आपण देखील गणपती बाप्पाच्या नैवेद्यात अशा प्रकारचा चमचमीत  वांगी भात करु शकतो. घरच्याघरीच मस्त चमचमीत वांगी भात तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.. 

साहित्य :- 

१. चणा डाळ - १ टेबलस्पून २. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून३. धणे - १ टेबलस्पून ४. काळीमिरी - १ टेबलस्पून ५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून६. लवंग - २ ते ३ काड्या७. दालचिनी - १ काडी८. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या ९. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून १०. मोहोरी - १ टेबलस्पून ११. हिंग - १/२ टेबलस्पून १२. कडीपत्ता - ३ ते ६ पाने १३. शेंगदाणे - १/२ कप १४. काजू - ५ ते ६ १५. वांगी - ६ ते ७ ( बारीक उभ्या फोडी चिरुन घ्या)१६. हळद - १/२ टेबलस्पून १७. मीठ - चवीनुसार १८. पाणी - गरजेनुसार १९. भात - २ ते ३ कप (वेगळा शिजवून घेतलेला) 

बाप्पांच्या प्रसादातील उरलेल्या लाह्यांची करा मऊसूत इडली! नाश्त्यासाठी पौष्टिक पदार्थ - इडल्या होतील पटकन फस्त... 

मस्त गोडधोड चविष्ट रसमलाई मोदक! फक्त वाटीभर पनीर आणि १५ मिनिटांत मोदक तयार - पाहा इन्स्टंट रेसिपी...   

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका पॅनमध्ये चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, धणे, काळीमिरी, पांढरे तीळ,लवंग, दालचिनी, लाल सुक्या मिरच्या असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन कोरडेच परतवून घ्यावेत. २. पॅनमध्ये भाजून घेतलेले हे सगळे जिन्नस थोडे गार झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्रित घालून वांगी भातासाठी मसाला वाटून घ्यावा. ३. आता पॅनमध्ये थोडे साजूक तूप घेऊन त्यात, चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, मोहोरी, हिंग, कडीपत्ता, शेंगदाणे, काजू  घालून तुपात हलकेच परतवून घ्यावे. 

मोदकांसोबतच बाप्पाच्या नैवेद्याला करा अक्रोडचा हलवा ! जिभेवर रेंगाळणारी अप्रतिम चव, करताच होईल पटकन फस्त... 

४. मग यात वांग्याच्या उभ्या फोडी चिरुन घालाव्यात. त्यात चवीनुसार मीठ, हळद व गरजेनुसार पाणी घालावे. मग झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यावी. ५. सगळ्यात शेवटी यात शिजवून घेतलेला भात व तयार करुन घेतलेला कोरडा मसाला घालावा. मग सगळे जिन्नस एकत्रित  करून भात हलवून घ्यावा. ६. त्यानंतर एक ते दोन वाफ काढून वांगी भात शिजवून घ्यावा. 

मस्त, मसालेदार, चटपटीत वांगी भात खाण्यासाठी तयार आहे.

टॅग्स :अन्नपाककृती