Join us
Daily Top 2Weekly Top 5

वाळवण स्पेशल : खानदेशात करतात तसे नागलीचे पापड करण्याची अस्सल पारंपरिक रेसिपी आणि प्रमाण, आजींच्या ३ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2026 16:42 IST

Nachni papad recipe: Healthy millet crackers: Valavan special food: नाचणीचे पापड काळे पडू नये म्हणून काय करायचं पाहूया.

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला लोणची- पापड करण्याची लगबग पाहायला मिळते. पूर्वीच्या काळी आजीच्या हाताचे ते पांढरे शुभ्र आणि तेलात टाकल्यावर दुप्पट फुलणारे नाचणीचे पापड आजही आपल्याला आठवतात. नाचणी ही आपल्या आरोग्यासाठी सुपरफूड मानली जाते.(Nachni papad recipe) पण तिचे पापड करताना अनेकदा ते काळे पडतात किंवा तुटतात. पण पिठातील सत्व काढण्यापासून ते शिजवण्यापर्यंत काही गोष्टींची काळजी घेतल्यास पापड अगदी चविष्ट होतात. (Healthy millet crackers)नाचणीमध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम आणि लोह असते. त्यामुळे हे पापड फक्त चवीलाच नाही तर आरोग्यासाठी देखील उत्तम असतात.(Valavan special food) अनेकदा आपण बाजारातून विकतचे पापड आणतो पण घरात बनवलेल्या पारंपरिक पापडांची सर कशालाच येत नाही. जर आजीच्या हातची ती अस्सल चव हवी असेल आणि पापड वर्षभर कडकडीत राहावे असे वाटत असेल, तर काही खास टिप्स लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

अस्सल खान्देशी चवीचं वांग्याचं भरीत करण्यासाठी पाहा वांगी कशी निवडायची, झणझणीत पारंपरिक रेसिपी

साहित्य 

नाचणी - १ किलोपाणी- १ मोठी वाटीहिंग - १ चमचापापडखार - २ चमचेसोडा - चिमूटभरओवा पूड - १ चमचाजिरे पावडर - १ चमचामीठ - चवीनुसारबडीशेप पूड - १ चमचातीळ - १ छोटी वाटी 

कृती 

1. सगळ्यात आधी नाचणी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर एका भांड्यात तीन दिवस भिजत ठेवा. प्रत्येक दिवशी पाणी बदलत राहा. 

2. यानंतर भिजवलेली नाचणी व्यवस्थित उन्हात वाळवून घ्या. नाचणी व्यवस्थित वाळल्यानंतर त्याचे पीठ दळून घ्या. एका एका पातेल्यावर कॉटनच्या कपड्यात नाचणीचे दळलेले पीठ घेऊन हाताने ते घासा. ज्यामुळे नाचणीतील कोंडा निघून जाईल. 

3. आता एका पातेल घेऊन त्यात पाणी घाला. १ वाटी नाचणीचे पीठ असेल तर त्यात १ वाटी पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर एका ताटात हिंग, पापडखार, सोडा, ओवा पूड, जिरे पूड, मीठ आणि बडीशेप एकत्र करुन पाण्यात घाला. नंतर त्या नाचणीचे पीठ घालून चमच्याने व्यवस्थित घोटून घ्या. पीठ शिजवताना ते मध्यम आचेवर आणि सतत ढवळत शिजवावे.

4. पीठ व्यवस्थित घोटल्यानंतर वरुन त्यात तीळ घाला. पीठ थोडे थंड झाल्यानंतर व्यवस्थित मळून घ्या. आता तयार पिठाचा गोळा घ्या आणि पापड लाटा. उन्हामध्ये दोन ते तीन दिवस वाळवून घ्या. जर पापडात थोडाही ओलावा राहिला, तर तो तेलात फुलत नाही आणि लवकर खराब होतो. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Traditional Finger Millet Papad Recipe: A Khandesh Special with Grandma's Tips

Web Summary : Make healthy, crispy finger millet papads at home with this traditional Khandesh recipe. Learn the secret to prevent them from turning black and ensure they stay fresh all year. Follow grandma's tips for the perfect papad!
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल