एक असा पदार्थ आहे, जो खाण्यासाठी उपास न पाळणारे सुद्धा अचानक उपास ठेवतात. तो पदार्थ म्हणजे साबुदाणा खिचडी. (Use These Tips To Make Perfect Sabudana Khichdi)उपासाच्या पदार्थांचा राजा अस जर साबूदाणा खिचडीला म्हटलं तर, त्यात काही वावगं ठरणार नाही. कोणताही सण असो , उपासाला खिचडी तर तयार केली जातेच. अर्थात प्रत्येकाची पद्धत, पाककृती थोडीफार वेगवेगळी असते. पण कशीही तयार करा, साबुदाणा खिचडीला काही तोड नाही. (Use These Tips To Make Perfect Sabudana Khichdi)महाराष्ट्राच्या पारंपारिक पदार्थांमध्ये या खिचडीचा समावेश होतो. फक्त उपासालाच नाही तर, सहज नाश्त्यासाठीही आपल्याकडे साबुदाणा खिचडी तयार केली जाते. आता घरोघरी साबुदाणा भिजवला जाईल, कारण महाशिवरात्र जवळ आली आहे. अनेक जणींची तक्रार असते की खिचडी फार चामट झाली किंवा मग काही जणी म्हणतात, "चामट कसली साफ कोरडी होऊन गेली." तुमची खिचडीही अशीच होते का? मग या टिप्स खास तुमच्यासाठी.
१. साबुदाणा आपण आदल्या रात्री भिजत घालतो. त्यामुळे तो छान फुलून येतो. (Use These Tips To Make Perfect Sabudana Khichdi)चवीलाही छान लागतो. पण तो आपण व्यवस्थित धूत नाही. त्यामुळे तो चामट होतो. साबुदाणा ४ ते ५ वेळा पाण्यातून काढायचा. व्यवस्थित हाताचा वापर करून खळबळवायचा. त्याचे पांढरे पाणी जाऊ द्यायचे. मग तो स्वच्छ पाण्यात भिजवायचा.
२. भिजवताना आपण जास्तीचे पाणी ठेवतो. त्यामुळे मग साबुदाण्यामध्ये जास्त पाणी शोषले जाते. म्हणून मग परतून झाल्यावर तो खुपच कडक होतो. त्यामुळे साबुदाणा भिजेल एवढेच पाणी ठेवायचे असते. साबुदाणा अगदी कमी पाण्यात मस्त भिजतो.
३. भिजलेला साबुदाणा वापरायला घ्यायच्या आधी एक लहानशी ट्रिक वापरल्याने खिचडी मस्त लुसलुशीत होते. करायचे असे की, साबुदाण्याला दोन चमचे दही लावायचे. किंवा दोन चमचे ताक घालायचे. परत थोडावेळ झाकून ठेवायचे. ही टीप वापरून तर बघा. खिचडी अजिबात कोरडी होणार नाही.
४. साबुदाणा खिचडी तयार करताना बरेच जण थोडं तूप व थोडं तेल असं वापरतात. तेलामुळे साबुदाणा जास्तच परतला जातो. त्यामुळे तो कोरडा व कडक लागतो. खिचडी पूर्णपणे तुपावरच तयार करा.