मार्च महिना सुरू झाला आहे म्हणजे घरोघरी वाळवणांची तयारी ही सुरू झालीच असणार. घामाच्या धारा पदराला पुसत आई शेकडोंनी पापड तयार करून ठेवायची. (urad dal papad premix recipe )वाळवणावर लक्ष ठेवायला मात्र फारच कंटाळा यायचा. आई पापड तायर करणार कळल्यावर तोंडाला पाणी सुटायचे. हे तोंडाला सुटलेले पाणी पापडासाठी असतेच. पण जास्त चविष्ट लागतात ते पापडाचे डांगर. मग पोह्याचे डांगर असोत किंवा मग उडदाचे डांगर असोत. (urad dal papad premix recipe )तेलामध्ये बुडवून कच्चे डांगर अगदी पोट बिघडेपर्यंत घरातील सगळेच खातात. आईचे किलोभर पापड कमीच लाटले जातात. कारण डांगर पटापट फस्त होतात.
आपण बरेचदा बाजारात तयार मिळणारे उडदाचे पापड मिक्स विकत आणतो. मग पाण्यात ते तयार पीठ टाकून ते पीठ मळून घेतो. (urad dal papad premix recipe )आणि झटपट पापड तयार करतो. पण स्वत:हून पापडाचं डांगर तयार करण्याची मज्जाच काही और आहे. घरीच हे पीठ तयार करणे मळण्यापेक्षा नक्कीच सोपे आहे.
साहित्य
उडदाची डाळ, हिंग, काळीमिरी, पापड खार, मीठ, पाणी, तेल, दोरा
कृती
१. उडदाची डाळ दळून आणायची. मिक्सरलाही फिरवू शकता. मात्र गिरणीत दळलेली आणि मिक्सरमध्ये वाटलेली यामध्ये फरक पडतो.
२. पापड मसाला बाजारात विकत मिळतो. पण तो तयार करणे फारच सोपे आहे. त्यामुळे घरीच तयार करा. त्यासाठी थोडी काळीमिरी ठेचून घ्यायची. भुगा करायचा नाही. जरा जाडसर ठेवायची.
३. काळीमिरी पूडमध्ये मीठ, पापड खार, हिंग सगळं चवीनुसार घालून घ्यायचे. ते सगळं मस्त मिक्स करून घ्या.
४. दळलेल्या उडीदाच्या पीठामध्ये मसाला घालायचा. ते ही नीट मिक्स करायचे. नंतर त्यामध्ये पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. पाणी गरजे इतपतच वापरा. कारण मळलेले पीठ कुटल्यावर मऊ होतेच.
५. पीठ नीट मळून झाल्यावर ते थोडावेळ झाकून ठेवायचे. जरा सेट झाले की, मग वरवंट्याने किंवा खलबत्ता वापरून मस्त कुटून घ्यायचे. पीठ कुटण्याआधी त्याला तेल लावायचे. कुटलेल्या पीठाचे लांब-लांब तुकडे करून घ्यायचे.
६. दोऱ्याच्या मदतीने समान लाट्या पाडून घ्या.