Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mahashivratri 2026 : यंदाची महाशिवरात्र होईल खास! करा उपवास पराठा आणि चटणी, मिळेल भरपूर एनर्जी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2026 16:56 IST

Upvasacha Aloo Paratha : Mahashivratri Recipe Fasting Aloo Paratha Recipe : Upwas aloo paratha Fasting recipe : महाशिवरात्रीला करा गरमागरम पराठा आणि चटणी, पाहा सोपी रेसिपी...

महाशिवरात्रीचा सण उत्सव सुरु होण्यास आता अवघे काहीच तास बाकी आहेत. फक्त महाराष्ट्रात नसून, देशभरात महाशिवरात्री उत्साहाने साजरा करण्यात येते. या दिवशी बरेचजण विशेषतः महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात उपवास करतात. उपवास (Mahashivratri Recipe : Fasting Aloo Paratha Recipe) म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर फक्त साबुदाण्याची खिचडी येते. परंतु, फक्त साबुदाण्याची खिचडी न करता आपण विविध प्रकारचे चविष्ट आणि हेल्दी पदार्थ (Upvasacha Aloo Paratha) खाऊन देखील उपवास करू शकतो.

उपवासाला साबुदाण्याच्या खिचडीपासून ते वड्यापर्यंत अनेक पदार्थ तयार केले जातात. परंतु प्रत्येकवेळी उपवासाला (How To Make Fasting Aloo Paratha) काय नवीन पदार्थ तयार करायचा? असा प्रश्न देखील पडतो. यासाठीच, यंदाच्या उपवासाला झटपट तयार होणारे उपवासाचे साबुदाणा - आलू पराठे आणि चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात(Upwas aloo paratha Fasting recipe).

१. उपवासाच्या साबुदाणा - बटाट्याच्या पराठ्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. साबुदाणा - २ कप २. बटाटे - ३ ते ४ (उकडवून घेतलेले)३. आलं - १/२ टेबलस्पून (किसलेलं)४. मीठ - चवीनुसार५. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ (बारीक चिरलेल्या)६. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)७. साजूक तूप / तेल - २ ते ३ टेबलस्पून

२. उपवासाच्या चटणीसाठी लागणारे साहित्य :-

१. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - १ कप २. हिरव्या मिरच्या - २ ते ३ ३. मीठ - चवीनुसार ४. दही - १ टेबलस्पून ५. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

डायबिटीसमध्ये भात खा बिंधास्त, 'नो टेन्शन'! 'या' स्मार्ट पद्धतीने भात खाल्ला तर ना शुगर वाढेल ना वजन...

वाटल्या तांदळाची बटाटा भजी, ‘अशी’ कुरकुरीत भजी तुम्ही कधी खाल्ली नसतील, पाहा खमंग रेसिपी...

उपवासाच्या पराठ्याची कृती :- 

१. सगळ्यात आधी बटाटे प्रेशर कुकरला लावून उकडवून घ्यावेत. २. एका कढईत साबुदाणे घेऊन ते कोरडेच २ ते ३ मिनिटे परतवून घ्यावेत. मग साबुदाणे एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. ३. थंड झालेले साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यात ओतून व्यवस्थित वाटून त्याचे बारीक पीठ करून घ्यावे. मग हे पीठ बारीक गाळणीने गाळून घ्यावे.  ४. एका बाऊलमध्ये साबुदाण्याचे पीठ, उकडवून कुस्करुन घेतलेले बटाटे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, किसलेलं आलं, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ असे सगळे जिन्नस एकत्रित करून त्याचे घट्ट असे पीठ मळून घ्यावे. ५. तयार पिठाचे गोळे करून ते नेहमीसारखेच चपातीप्रमाणे गोलाकार लाटून घ्यावे. ६. पॅनवर साजूक तूप किंवा तेल सोडून तयार पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा. 

खान्देश स्पेशल,  चमचमीत...फौजदारी डाळ! नावातच दरारा, झणझणीत रस्सा आणि लालभडक तर्री - एकदा खाल्लीत की चव विसरणार नाही... 

उपवासाच्या चटणीची कृती :-

१. एका मिक्सरच्या भांड्यात भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घ्यावा. २. त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, दही, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गरजेनुसार पाणी घालावे. ३. आता मिक्सरमध्ये हे सगळे जिन्नस एकत्रित घालून व्यवस्थित वाटून त्याची चटणी तयार करून घ्यावी. 

उपवासाचा साबुदाणा - बटाट्याचा झटपट होणारा गरमागरम चविष्ट पराठा खाण्यासाठी तयार आहे. हा तयार पराठा आपण हिरवी चटणी किंवा दह्यासोबत खाऊ शकता.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahashivratri Special: Fasting Aloo Paratha and Chutney Recipe for Energy

Web Summary : Make your Mahashivratri fast special with Sabudana-Aloo Paratha and chutney. This recipe provides energy during fasting. Learn how to quickly prepare this dish with simple ingredients like sabudana, potatoes, and spices.
टॅग्स :अन्नपाककृतीमहाशिवरात्री