Join us
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळा वाळवण स्पेशल: किलोभर पोह्याचे करा डबाभर पापड, खुसखुशीत पापड करण्याची पारंपरिक पद्धत- दुप्पट फुलणारे पापड खा वर्षभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2026 17:22 IST

Khuskhushit pohyache papad recipe: Pohyache papad recipe Marathi: पाहूया पोह्यांचे पापड करण्याची सोपी कृती

उन्हाळा सुरू झाला की घरोघरी वाळवणाचे पदार्थ हमखास केले जातात. वर्षभराची साठवण म्हणून पापड, कुरड्या आणि वेफर्स बनवण्याची लगबग प्रत्येक अंगणात आणि गच्चीवर पाहायला मिळते. या सर्व वाळवणाच्या प्रकारांमध्ये 'पोह्याचे पापड' हा अत्यंत लोकप्रिय आणि आवडीचा प्रकार आहे.(Khuskhushit pohyache papad recipe) साबुदाणा किंवा बटाट्याच्या पापडांपेक्षा पोह्याचे पापड बनवायला अत्यंत सोपे, चवीला आणि पचायला हलके असतात. अनेकदा पापड लाटताना ते फाटतात किंवा वाळल्यावर त्यांना चिरा पडतात, अशी तक्रार गृहिणींकडून ऐकायला मिळते. पण पारंपरिक पद्धतीचा वापर करून जर हे पापड बनवले, तर ते अजिबात बिघडत नाहीत.(Pohyache papad recipe Marathi)एक किलो पोह्यांपासून डबाभर खुसखुशीत पापड कसे तयार करायचे. ही पद्धत इतकी सोपी आहे की, तासनतास उन्हात बसून पापड लाटण्याची गरज भासणार नाही. पोह्यांचा योग्य वापर, पापडखाराचे अचूक प्रमाण आणि वाफवण्याची खास ट्रिक वापरली तर हे पापड तेलात टाकताच दुप्पट-तिप्पट फुलतात.(Pohyache papad paramparik paddhat) पांढरे शुभ्र आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे पोह्याचे पापड आपण वर्षभर साठवून ठेवू शकता आणि पावसाळ्यात किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकता. पाहूया पोह्यांचे पापड करण्याची सोपी कृती 

भाज्यांच्या सालीत दडलंय गुलाबाच्या सौंदर्याचं गुपित, रोपट्याला येतील भरपूर फुले, सोपा उपाय- उन्हाळ्यात रोप सुकणारही नाही

साहित्य 

जाड पोहे – अर्धा किलो हिंग – १ चमचा पापडखार – दीड चमचा जिरेपूड – १ मोठा चमचा मीठ – २ चमचे लाल तिखट – २ चमचे पाणी

 

कृती 

1. सगळ्यात आधी पोहे हलकेसे गरम करून गिरणीमध्ये त्याचे बारीक पीठ तयार करून घ्या. आता त्या पिठामध्ये मीठ आणि बाकीचे सर्व साहित्य घालून चांगले मिक्स करा.

2. हे रेडी मिक्स तयार झाल्यावर एखाद्या भांड्याने मोजून पीठ घ्या. जेवढे पीठ घेतले तेवढेच पाणी घ्या आणि थोडे थोडे पाणी घालत घट्ट असा पिठाचा गोळा भिजवा.

3. आता हे पीठ १० मिनिटे झाकून रेस्ट होण्यासाठी ठेवा. १० मिनिटांनंतर पीठ मिक्सरमध्ये वाटून किंवा ठेचून मऊ करून चांगले मळून घ्या. 

4. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळा घेऊन पातळ पापड लाटा. पापड लाटताना तेलाचा वापर करू नका. सर्व पापड लाटून झाल्यावर चांगल्या उन्हात पूर्णपणे वाळवून घ्या. वर्षभर टिकणारे कुरकुरीत पोह्याचे पापड तयार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Crispy Poha Papad Recipe: Make and store these for the year!

Web Summary : Make crispy poha papads easily at home for year-long enjoyment. This traditional recipe ensures they don't break and puff up perfectly when fried. Requires minimal effort, perfect for summer!
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल