बाप्पाचा आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक. मोदकाची चव आपण नेहमीच चाखतो.(How to make Ukadiche Modak using mango juice) यामध्ये वेगवेगळे फ्लेवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. उकडीचे, तळणीचे, खोबऱ्याचे, माव्याचे, दुधाचे असे आपण खातो.(Traditional steamed Modak recipe with a mango twist) गणपतीच्या बाप्पाच्या नैवेद्यासाठी विशेषत:उकडीचे मोदक केले जातात.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवतो.(Tips to make Modak that won’t burst while steaming) तांदळाच्या पिठापासून उकडीचे मोदक बनवता येतात. सध्या उन्हाळा सुरु आहे आणि अशातच आंब्याच्या मौसम देखील आहे.(Step-by-step guide for fluffy and neat Modak) यानिमित्ताने आपण आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक ट्राय करूयात. पारंपरिक आंबा मोदक रेसिपी कशी बनवायची. प्रमाण अचूक असेल तर फुटणार देखील नाहीत. उकडीचे मोदक करताना या टिप्स लक्षात ठेवा. (Perfect Modak dough for mango juice variation)
साबुदाण्याची खिचडी वातड - कडक होते? ५ चुका टाळा- खिचडी होईल मोकळी- मऊसुत
साहित्य
तूप - ३ चमचे
ओल्या नारळाचा किस- २ वाटी
आंब्याचा रस -१ १/२ वाटी
गूळ - १ वाटी
भाजलेली खसखस - २ चमचे
वेलची पूड - १ चमचा
जायफळ - आवश्यकतेनुसार
पाणी - १ वाटी
मीठ - १/४ चमचा
तांदळाचे पीठ - २ वाटी
कृती
1. सगळ्यात आधी कढईमध्ये २ चमचे तूप, ओल्या नारळाचा किस, अर्धी वाटी आंब्याचा रस, गूळ घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या.
2. त्यानंतर त्यात भाजलेली खसखस, वेलची पूड, किसलेला जायफळ घालून पुन्हा एकजीव करा.
3. आता एका पातेल्यात १ वाटी पाणी घालून त्यात १ वाटी आंब्याचा रस तूप आणि मीठ घाला. मिश्रण चांगले ढवळून घ्या. उकळी आल्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून लाटण्याने ढवळत राहा. १० मिनिटे पीठ झाकून ठेवा.
4. पीठ ताटात काढून त्याला चांगले मॅश करा. पाण्याचा हात लावून मऊसुत मळून घ्या. पीठ चांगले मळल्यानंतर गोळे तयार करुन साच्यात भरा. चांगले हाताने दाबून आंबा-नारळाचे सारण भरा.
5. आपल्याला साच्याचे मोदक नको असतील तर हाताने कळ्या पाडून देखील तयार करा. केळीच्या पानांत ठेवून वरुन केशर लावा. उकड काढून घ्या.
6. वाफवल्यानंतर ताटात काढून वरुन साजूक तुपाची धार सोडा. तयार होतील, आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक