Join us

उड्डपी स्टाईल परफेक्ट शेवग्याचे सांबार करा घरीच, झटपट होणारी रेसिपी- चवीलाही मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 09:05 IST

quick sambar recipe for rice: traditional south indian lunch ideas : खास पारंपरिक उड्डपी स्टाईल सांबार कसे कराल?

दक्षिण भारतातील पदार्थ इडली, मेदू वडा, उतप्पा हे आता जगभरात खाल्ले जाते.(South Indian food) करायला सोप्पे आणि पचायला देखील हलके असतात. परंतु, या पदार्थांची चव सांबारशिवाय अपूर्णच.(Sambar Recipe) दक्षिण भारतातल्या उड्डपी जेवणाची शैली साधी, सात्विक आणि चविष्ट म्हणून ओळखली जाते. उड्डपी स्टाईल सांबार केवळ पदार्थ नसून तो संस्कृतीचा आणि शुद्ध आहारशैलीचा एक भाग म्हटला जातो. (Udupi style sambar)या भागात सांबार बनवताना त्यात मुख्य घटक शेवग्याच्या शेंगा असतात. त्या चवीला छान आणि शरीरासाठी पोषकही असतात.(udupi style drumstick sambar recipe) यामध्ये तूरडाळ, नारळ, भाजलेला मसाला आणि साजूक तुपाची फोडणी देऊन हा सांबार तयार केला जातो. इडली, डोसा किंवा मेदू वड्यासोबत खाणे म्हणजे मंदिराचा प्रसाद जणू असं म्हणतात. खास पारंपरिक रेसिपी कशी करायची पाहूया. (quick sambar recipe for rice)

जवस-तिळाची चटणी खा रोज, महिलांच्या सर्व आजारांवर गुणकारी! हाडांची दुखणी-बद्धकोष्ठतेचा त्रास होईल कमी

साहित्य 

शेवग्याची शेंग, वांगी, गाजर, बटाटा आणि बीन्स - २ कप तुरीची डाळ -  १/२ वाटीउडदाची डाळ -  १/२ वाटीधने - १ चमचा जिरे - १ चमचा राई - १ चमचा लाल मिरच्या - २ ते ३ओले खोबरे - ३ चमचेमेथी दाणे- ३ ते ४ हळद - अर्धा चमचाचिंच मीठ - दीड चमचासांभार पावडर - १ चमचा गूळ - १ चमचा कढीपत्ता - १० ते १५ कोथिंबीर 

 

 

कृती 

1. सगळ्यात आधी शेवग्याची शेंग, वांगी, गाजर, बटाटा आणि बीन्स कापून घ्या. वांगी आणि बटाटा कापल्यानंतर पाण्यात ठेवा. बाकी साहित्य पाण्याने धुवून घ्या. 

2. तुरीची डाळ धुवून घ्या. आता कुकरमध्ये धुतलेली तुरीची डाळ, कापलेले सर्व साहित्य आणि पाणी घालून २ ते ३ शिट्ट्या होऊ द्या. 

3. त्यानंतर पॅनमध्ये मसाला तयार करण्यासाठी हळद, धने, जिरे, राई, लाल मिरच्या, ओले खोबरे, मेथी दाणे, चिंच, उडदाची डाळ चांगले भाजून घ्या. 

4. मिक्सरच्या भांड्यात भाजलेले सर्व साहित्य पाणी घालून वाटा. त्यानंतर तयार मसाला कुकरमध्ये शिजलेल्या भाज्यांमध्ये घाला. वरुन मीठ, सांबार मसाला आणि गूळ घाला. उकळी आल्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर घाला.  गरमागरम भातासोबत किंवा इडलीसोबत खा उड्डपी स्टाईल सांबार. 

 

टॅग्स :अन्नपाककृती