हिवाळा आला की बाजारात ताजे आणि हिरवेगार मटार मोठ्या प्रमाणात येतात. मटार पनीर, मटार पुलाव किंवा गरमागरम कटलेट... मटार घालून तयार केलेल्या पदार्थांची चव काही औरच असते! भाज्यांमध्ये सध्या मटार वर्षभर मिळत असले तरी हिवाळ्यात मिळणारे मटार हे अधिक जास्त फ्रेश आणि चवीला सुंदर लागतात. हिवाळ्याच्या बाजारात प्रत्येक भाजीच्या ठेल्यावर हिरव्यागार मटारचा छान ढिग रचलेला असतोच. हे हिरवेगार मटार पाहून आपल्याला ते विकत घेण्याचा मोह आवरता येत नाही(how to peel green peas fast).
हिवाळ्यात मिळणारे फ्रेश, ताजे मटार पुढील वर्षभर मिळावेत यासाठी आजही काही घरात मटार एकदाच भरपूर प्रमाणात विकत आणून स्टोअर केले जातात. मटारचा सिझन हिवाळ्यात असल्याने या ऋतूूत मटार स्वस्त आणि मस्त मिळतात. अशावेळी मटार भरपूर प्रमाणात विकत तर आणतो पण ते सोलून त्यातील दाणे काढण्याचे कंटाळवाणे आणि वेळखाऊ काम करायला मात्र कोणालाच आवडत नाही. अशावेळी मटार सोलून त्यातील दाणे काढण्याचे हे वेळखाऊ काम झटपट (try these easy tips tricks to peel green peas easily) होण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवल्यात, या काही झटपट ट्रिक्स वापरून आपण अगदी कमी वेळात भरपूर मटारचे दाणे सोलू शकतो. पाहूयात नेमके काय करायचं ते...
मटार सोलण्याचे वेळखाऊ काम होईल झटपट...
१. मटार पाण्यातून उकळून घ्या :- मटारचे दाणे सोलण्याचे वेळखाऊ काम करायला कुणालाच आवडत नाही. याचबरोबर, दाणे सोलण्यात बराच वेळ जातो. यासाठी मटारच्या शेंगा पटकन सोलून दाणे काढण्यासाठी मटार पाण्यातून उकळून घ्यावेत. यासाठी एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन ते पाणी उकळवून घ्यावे. पाणी उकळल्यानंतर त्यात मटार घालावेत हे मटार २ ते ३ मिनिटे पाण्यात हलकेच उकळवून घ्यावेत. त्यानंतर हे मटार गरम पाण्यातून काढून बर्फाच्या थंड पाण्यात घालावेत. यामुळे मटारच्या साली मऊ पडून अगदी नरम होतील व सोलताना या साली पटकन निघून लगेच मटार सोले जातील.
२. पिशवीत घालून हलवा :- मटार झटपट सोलण्याचा हा देखील एक सोपा उपाय आपण करू शकता. हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त एका प्लॅस्टिकच्या पिशवीची गरज लागणार आहे. सर्व मटार एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घ्यावे. त्यानंतर या पिशवीचे तोंड बंद करून पिशवी हाताने जोरात हलवून घ्यावी. पिशवी आणि मटारच्या सालीत घर्षण झाल्यामुळे साली अगदी सहजपणे निघतात. ज्यामुळे मटार दाणे सोलाणे अगदी सहज शक्य होते.
३. मटार फ्रिजरमध्ये ठेवा :- मटार सहजपणे सोलून त्यातील दाणे काढण्यासाठी आपण फ्रिजरचा देखील वापर करू शकता. यासाठी मटार सोलण्याआधी किमान २ तास तरी फ्रिजरमध्ये ठेवावेत. फ्रिजरमध्ये मटार ठेवल्याने त्या पाण्याने हलक्या ओल्या होतील, अशी ओली झालेली मटारची साल फक्त हाताने दाबली तरी त्यातील दाणे अगदी सहजपणे निघतात.
अशाप्रकारे आपण या तीन सोप्या ट्रिक्स वापरून कमी वेळेत जास्त मटार सोलू शकता.
Web Summary : Enjoy fresh winter peas effortlessly! Learn three quick tricks: blanching, shaking in a bag, or freezing. These methods soften the pods, making shelling faster and simpler for delicious dishes.
Web Summary : ताज़ी सर्दियों की मटर का आसानी से आनंद लें! तीन त्वरित युक्तियाँ सीखें: ब्लैंचिंग, एक बैग में हिलाना, या फ्रीज़ करना। ये विधियाँ फली को नरम करती हैं, जिससे स्वादिष्ट व्यंजनों के लिए छीलना तेज़ और सरल हो जाता है।