Lokmat Sakhi >Food > आज गोड काय? सुधारस आणि पाकातल्या पुऱ्या, अस्सल पारंपरिक मराठी पदार्थ खाऊन तर पाहा

आज गोड काय? सुधारस आणि पाकातल्या पुऱ्या, अस्सल पारंपरिक मराठी पदार्थ खाऊन तर पाहा

Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes : तयार करून बघा या गोड रेसिपी. नक्की आवडतील.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2025 17:24 IST2025-02-21T17:23:24+5:302025-02-21T17:24:51+5:30

Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes : तयार करून बघा या गोड रेसिपी. नक्की आवडतील.

Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes. | आज गोड काय? सुधारस आणि पाकातल्या पुऱ्या, अस्सल पारंपरिक मराठी पदार्थ खाऊन तर पाहा

आज गोड काय? सुधारस आणि पाकातल्या पुऱ्या, अस्सल पारंपरिक मराठी पदार्थ खाऊन तर पाहा

तुम्हालाही मधेच अचानक गोड खायची इच्छा होते का? मग एकतर शिरा, नाही तर खीर तयार करायची.  घरी पटकन दुसरं काय तयार करणार? ( Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes.)बाहेरून विकत आणायचं म्हटलं म्हणजे खिशाला कात्री लागलीच म्हणून समजा. गोड पदार्थांच्या किंमती काहीच्या काही वाढलेल्या आहेत. शेकड्याच्या खाली हलवाई बोलायला मागतच नाहीत. आता पुढच्या वेळी जेव्हा गोड खायचं मन करेल, तेव्हा हे दोन पदार्थ तयार करून बघा. आपले पारंपारिक पदार्थ आहेत.( Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes.) आधी घरोघरी तयार केले जायचे. पण आजकाल फार तयार केले जात नाहीत. 

१. पाकातली पुरी( Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes.)
साहित्य: 
साखर, रवा, तूप, दूध, पाणी, तेल, मैदा, वेलची पूड

कृती: 
१. रवा मैदा एकत्र करून घ्या. त्यात थोडे-थोडे करून दूध घाला.  ते छान मळून घ्या. त्याला तूपही लावा. पुरी तळण्यासाठी जसं पीठ मळता अगदी तसच मळा. त्याला थोडावेळ झाकून ठेवा. 

२. आता साखरेचा पाक तयार करून घ्यायचा. त्यासाठी साखरेमध्ये पाणी घालून पाणी उकळून घ्यायचे. त्याची एक तार येईपर्यंत ते उकळायचे. त्यामध्ये वेलची पावडर घालायची. आपला पाक मस्त तयार होईल. 

३. एकीकडे तेल तापवत ठेवा. पुरी तळण्याएवढे ते तापवून घ्या. थोडीशी जाडसर पुरी लाटा. तळताना पुरी मस्त फुलू द्या. तळून काढली की लगेच पाकात टाकायची. दहा मिनिटांनी पाकातून काढायची. जास्त वेळ पाकात ठेवायची नाही.
 
जर मैदा वापरायचा नसेल तर कणीक वापरू शकता.   

२. सुधारस  
साहित्य:
साखर, पाणी, सुकामेवा, वेलची पूड, लिंबू

कृती:
१. सुधारस तयार करायला खुपच सोपा आहे. एका भांड्यात साखर घ्या. त्यात पाणी घाला. ते उकळून घ्या. मस्त पाक तयार करा. त्यात वेलची पावडर घाला. 

२. पाक चिकट झाला की गॅस बंद करा. त्यामध्ये सुकामेवा घाला.  लिंबू पिळा. 

पोळीशी खा. किंवा पुरीशी खा. चवीला खुपच मस्त लागतो. अगदी सोपा आहे आणि झटपट तयार होतो. केळ्याचे तुकडेही वापरू शकता.  
 

Web Title: Try Sudharas and Pakatli Puri, authentic traditional Marathi dishes.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.