Join us

गावरान पद्धतीचं खारं वांगं, झणझणीत-पारंपरिक रेसिपी, टम्म फुगलेल्या भाकरी-भातासोबत चव चाखा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 09:05 IST

traditional khar vang recipe: village style khar vang: spicy brinjal curry recipe:सकाळच्या डब्ब्यात किंवा आज भाजी काय बनवू असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर खारं वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा.

वांग्याचं नाव जरी काढलं तरी काहीच्या तोंडाला पाणी सुटते तर काही जण नाक मुरडतात.(traditional khar vang recipe) त्यामुळे सहसा काही घरात वांगी बनवली जात नाही. वांग्याचे विविध पदार्थ बनवले जातात. गरमागरम भाकरीसोबत वांग्याचं भरीत, वांगी रस्सा, भरली वांगी असे अनेक पदार्थ आहे.(village style khar vang) पण वांगी बनवण्याची देखील पारंपरिक पद्धत आहे. ज्याच्यामुळे त्याची चव आणखी वाढते. (spicy brinjal curry recipe)आपण भरली वांगी नेहमीच खातो पण कधी झणझणीत गावरान पद्धतीचं खारं वांगं करुन पाहिलय का? शहराकडेच्या भागात असे काही पदार्थ लोप पावताना दिसत आहे.(khar vang with bhakri) परंतु, सकाळच्या डब्ब्यात किंवा आज भाजी काय बनवू असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल तर खारं वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करुन पाहा. (Maharashtrian brinjal curry)

काळ्या चण्याचा कुरकुरीत मसाला डोसा, आंबवणे-भिजवण्याची गरज नाही, काही मिनिटांत करा

साहित्य वांगीशेंगदाणे - १ वाटीसुके खोबरेजिरे - २ चमचेलसूण - ५ ते ६ पाकळ्याहिरवी मिरची - आवश्यकतेनुसार कोथिंबीरहळद - दीड चमचातेल - २ चमचेमोहरी - १ चमचागरम पाणी

 

कृती 

1. सगळ्यात आधी शेंगदाणे तव्यावर खरपूस भाजून घ्या. त्यानंतर तव्यावर तेल घालून सुके खोबरे, लसूण, जिरे व्यवस्थित भाजून घ्या. 

2. आता शेंगदाण्याचा कूट तयार करुन घ्या. त्यानंतर तव्यावर परतवलेल सुके खोबऱ्याचे सारण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, मीठ पाटावर किंवा मिक्सरमध्ये वाटा. 

3. तयार वाटणामध्ये शेंगदाण्याचा कूट, हळद आणि तेल घालून हाताने चांगले एकजीव करा. 

4. आता वांग्याचे वरचे देठ थोडे तोडून घ्या. वांग्याला मध्यभागी चार चिरा पाडून पाण्यात घाला. पाणी व्यवस्थित नितरवून त्यात तयार मसाला भरुन घ्या. 

5. कढईत तेल गरम करुन त्यात जिरे - मोहरी घाला. त्यानंतर भरलेली वांगी घालून उरलेला मसाला बाजून घ्या. व्यवस्थित परतवून घ्या. 

6. झाकण झाकून त्यावर थोडे पाणी घाला. १० मिनिटांनंतर ते ताटावरचे पाणी वांग्याच्या भाजीत घाला. वरुन मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. 

7. १० ते १५ मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्या. गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खा गावरानं पद्धतीचं झणझणीत खारं वांगं.  

 

टॅग्स :अन्नपाककृती