Join us

विदर्भातील पारंपरिक पदार्थ 'ताक- भाकरी', सकाळच्या नाश्त्यात करा, पोटाला थंडावा देणारी पौष्टिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 14:57 IST

Taak Bhakri recipe: traditional Vidarbha breakfast: सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे हा प्रश्न असेल तर पारंपरिक पद्धतीची ताक-भाकरी रेसिपी करुन पाहा.

महाराष्ट्रात असे अनेक जिल्हे आहेत जिथे आजही पारंपरिक पदार्थ चवीने खाल्ले जातात. (Taak Bhakri recipe)भाकरी ही कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने खाल्ली जाते.(traditional Vidarbha breakfast) ज्वारीची, तांदळाची किंवा बाजरीच्या पिठापासून बनवलेली भाकरी आरोग्यासाठी चांगले असते.(how to make Taak Bhakri)सकाळच्या नाश्त्याला काय बनवायचे असा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो.(cooling Indian breakfast recipe)अनेकदा भाकरी बनवल्यानंतर ती फसते किंवा कडक होते अशावेळी टाकून देण्याऐवजी आपण त्याचा नाश्ता बनवला तर घरातील मंडळी देखील आवडीने खातील.(summer breakfast Indian recipes) चवीला उत्तम आणि आगळी-वेगळी रेसिपी आपल्या शरीराला भरपूर एनर्जी देते. फोडणी आणि मसाले घालून हा पदार्थ गावाकडे केला जातो.(nutritious Indian flatbread recipe) ही रेसिपी उरलेल्या शिळ्या भाकरीची बनवली जाते. जर सकाळच्या नाश्त्यात काय बनवायचे हा प्रश्न असेल तर पारंपरिक पद्धतीची ताक-भाकरी रेसिपी करुन पाहा. 

भारती सिंग मुलासाठी करते हेल्दी ड्रायफ्रुट्स चॉकलेट्स, कमी खर्चात होणारी हेल्दी-पौष्टीक रेसिपी

साहित्य 

शिळ्या भाकरी - २ ते ३ दही - १ कप मिरपूड - १ चमचा मीठ - चवीनुसार पाणी - १ वाटी बारीक चिरलेला कांदा - १ वाटी बारीक चिरलेला कोथिंबीर - आवश्यकतेनुसार तेल - १ मोठा चमचा मोहरी - १ चमचा जिरे - १ चमचा मेथी दाणे - अर्धा चमचा हिंग - १ छोटा चमचा लाल मिरच्या - २हळद - १ चमचा 

कृती 

1. सगळ्यात आधी शिळ्या भाकरीचे बारीक तुकडे करुन घ्या. मिक्सरमध्ये वाटून किंवा हाताने आपण काही प्रमाणात बारीक करु शकतो. 

2. आता एका बाऊलमध्ये दही, मिरपूड, मीठ आणि समप्रमाणात पाणी घालून फेटून घ्या. ताक तयार होईल. 

3. बारीक केलेल्या भाकरीला एका भांड्यात घेऊन त्यात ताक, चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला. 

4. फोडणी देण्यासाठी तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, मेथी दाणे, हिंग, लाल मिरच्या आणि हळद घाला. 

5. तयार केलेली फोडणी भाकरीच्या सारणावर घाला. चमच्याने मिक्स व्यवस्थित एकजीव करा. सर्व्ह करा विदर्भातील खमंग पौष्टिक पदार्थ ताकातील भाकरी. 

 

टॅग्स :अन्नपाककृती