Join us

Pitru Paksha 2025 : श्राद्ध भोजनात करा पारंपरिक भोपळ्याची भाजी, चुकूनही घालू नका ‘या’ २ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2025 16:20 IST

Pitru Paksha 2025: Shraddha food recipes: Pumpkin recipe for Pitru Paksha: आपल्याला कांदा-लसूण न घालता ही भाजी बनवायची असेल तर सोपी पद्धत पाहा.

पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करुन त्यांना स्मरण करण्याचा पंधरवडा समजला जातो.(Pitru Paksha 2025) या काळात बनवल्या जाणाऱ्या पदार्थांना देखील विशेष महत्त्व असतं.(Shraddha food recipes) भोपळ्याची भाजी ही पितृपक्षात बनवली जाणारी खास भाजी.(Pumpkin recipe for Pitru Paksha) ही जवळजवळ प्रत्येक घरात बनवली जाते.(Pitru Paksha dos and don’ts) भोपळ्याची भाजी हलकी, पचायला सोपी आणि सात्विक असते म्हणून बनवली जाते. पण ही भाजी करताना काही पदार्थ घालणे वर्ज्य मानले जाते. श्राद्धाचे जेवण हे सात्विक असायला हवे. त्यात कांदा-लसणाचा वापर शक्यतो टाळला जातो. श्राद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या भोपळ्याच्या भाजीत लसूण आणि कांदा देखील घातला जातो. पण जर आपल्याला कांदा-लसूण न घालता ही भाजी बनवायची असेल तर सोपी पद्धत पाहा. 

गरमागरम वरण-भातासोबत खा कारल्याचे मसालेदार कुरकुरीत काप, सोपी रेसिपी

साहित्यभोपळा - १ वाटी टोमॅटो प्युरी - १ वाटी जिरे - १ चमचा मेथी दाणे - १ चमचा हळद - १ चमचा तमालपत्र - १बडीशेप - १ चमचा लाल तिखट - १ चमचा धणे पावडर - १ चमचा गरम मसाला - १ चमचा मीठ - चवीनुसार 

घरी विरजण लावलेले दही आंबट होते? १ सोपी ट्रिक - आंबटपणा जाऊन दही होईल घट्ट

1. सगळ्यात आधी आपल्याला भोपाळा घ्यावा लागेल. भोपळा घेताना तो जास्त पिकलेला किंवा कच्चाही नसावा. थोडा कच्चा आणि थोडा पिकलेल्या स्वरुपात असावा. त्यानंतर भोपळा धुवून सोलून घ्या. त्याचे लहान आकारात तुकडे करा. ज्यामुळे तो लवकर शिजेल. 

2. आता एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करुन त्यात तमालपत्र, मेथी दाणे, बडीशेप आणि जिरे घाला. मसाले मंद आचेवर फ्राय करुन घ्या. त्यानंतर त्यात कसुरी मेथी घाला. ज्यामुळे भाजीला वेगळ्या प्रकारची चव येईल. मसाले चांगले भाजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर आणि गरम मसाला घाला. मसाले मंद आचेवर भाजून घ्या. ज्यामुळे भाजी अधिक चविष्ट होईल. 

3. मसाले शिजत असताना त्यात दोन टोमॅटो बारीक करुन त्याची पेस्ट घाला. मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मिसळा. टोमॅटोला तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. त्यानंतर चिरलेल्या भोपळ्याचे तुकडे घालून पुन्हा सर्व एकजीव करा. यात पाणी घालू नका. मंद आचेवर भाजी चांगली शिजू द्या. झाकण झाकून १० मिनिटे ठेवा. वरुन मीठ घालून चमच्याने हलवत राहा. भोपळा व्यवस्थित शिजल्यानंतर चपातीसोबत खा. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/5389123841203736/}}}}

टॅग्स :अन्नपाककृती