Lokmat Sakhi >Food > सणावाराला गोड पदार्थांसोबत करा मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ, चमचमीत खाऊन पाहूणेही होतील खूश

सणावाराला गोड पदार्थांसोबत करा मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ, चमचमीत खाऊन पाहूणेही होतील खूश

spicy usal recipe : festive food ideas: Maharashtrian usal recipe: आपल्यालाही काही तिखट चमचमीत पदार्थ हवा असेल तर मिक्स कडधान्याची उसळ बनवू शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2025 09:35 IST2025-08-09T09:30:00+5:302025-08-09T09:35:01+5:30

spicy usal recipe : festive food ideas: Maharashtrian usal recipe: आपल्यालाही काही तिखट चमचमीत पदार्थ हवा असेल तर मिक्स कडधान्याची उसळ बनवू शकतो.

traditional Maharashtrian usal recipe with Mix Sprouts bhaji protein-rich festive recipes | सणावाराला गोड पदार्थांसोबत करा मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ, चमचमीत खाऊन पाहूणेही होतील खूश

सणावाराला गोड पदार्थांसोबत करा मिक्स कडधान्याची झणझणीत उसळ, चमचमीत खाऊन पाहूणेही होतील खूश

श्रावण म्हटलं की यात अनेक उपवास आणि सण साजरे केले जातात.(Usal Recipe) उपवासाच्या पदार्थांची आपल्याला विविध पदार्थांची चव चाखली जाते.(festive food ideas) या काळात बऱ्यापैकी लोक उपवास करतात. उपवास सोडताना अनेकांच्या ताटात गोडासह तिखट पदार्थ देखील असतो. जर आपल्यालाही काही तिखट चमचमीत पदार्थ हवा असेल तर मिक्स कडधान्याची उसळ बनवू शकतो.(Maharashtrian usal recipe) महाराष्ट्रातील पारंपरिक आणि पौष्टिक डिश मिक्स कडधान्याची उसळ. यात हरभरा, मटकी, मूग, वाल, चवळी असे अनेक कडधान्य असतात. विविध मसाले घालून या भाजीची चव आणखी वाढवली जाते. (protein-rich Indian curry)
कडधान्याची उसळ ही केवळ चविष्ट नसून आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहे.(Indian lentil curry) यात प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मुबलक प्रमाणात मिळते. ही उसळ पोळी, भाकरी, भात किंवा पावासोबत आवडीने खाल्ली जाते. (spicy lentil recipes)

कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

साहित्य 

मिक्स कडधान्य - २ कप 
बटाट्याचे तुकडे - १ कप 
मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला - १
बारीक चिरलेला टोमॅटो - १ 
तेल - १ चमचा 
आलं-लसूण पेस्ट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा 
लाल मिरची पावडर - अर्धा चमचा 
गरम मसाला - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 


कृती 

1. सगळ्यात आधी कडधान्य रात्रभर भिजत ठेवा. ज्यामुळे त्याला मोड येतील.नंतर व्यवस्थित धुवून त्यातील पाणी काढून घ्या. बटाटा सोलून त्याचे चौकोनी तुकडे करा. 

2. आता कढईत तेल तापवून घ्या. त्यात कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतवून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला टोमॅटो, गरम मसाला, लाल मिरची पावडर,  हळद आणि मीठ घालून मसाला चांगला शिजवून घ्या. 

3. यामध्ये भिजवलेले मिक्स कडधान्य आणि बटाट्याचे तुकडे घाला. वरुन १ कप पाणी घाला. मंद आचेवर भाजी शिजू द्या. भाजी शिजल्यानंतर आणि उकळी आल्यानंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमागरम चमचमीत मिक्स कडधान्याची उसळ. 
 

Web Title: traditional Maharashtrian usal recipe with Mix Sprouts bhaji protein-rich festive recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.