Lokmat Sakhi >Food > कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीची 'तौशे भाकरी', पचायला अगदी हलकी आगळीवेगळी रेसिपी

कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीची 'तौशे भाकरी', पचायला अगदी हलकी आगळीवेगळी रेसिपी

Konkani cucumber bhakri: Traditional Konkani recipes: Cucumber flatbread recipe: कोकणात सकाळच्या नाश्त्यात तौशे भाकरी हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2025 15:28 IST2025-05-13T11:29:41+5:302025-05-13T15:28:55+5:30

Konkani cucumber bhakri: Traditional Konkani recipes: Cucumber flatbread recipe: कोकणात सकाळच्या नाश्त्यात तौशे भाकरी हा पदार्थ आवर्जून खाल्ला जातो.

Traditional Konkani dish 'Taushe Bhakri' made with cucumber breakfast food a very easy to digest and unique recipe | कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीची 'तौशे भाकरी', पचायला अगदी हलकी आगळीवेगळी रेसिपी

कोकणातील पारंपरिक पदार्थ काकडीची 'तौशे भाकरी', पचायला अगदी हलकी आगळीवेगळी रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात आपल्या घरी अनेक पदार्थ बनवले जातात.(Morning Breakfast idea) परंतु, कोकणात असे अनेक पारंपरिक पदार्थ आहेत ज्याची चव आजही चाखली जाते. घावन, धिरडे यांची चव आतापर्यंत अनेकांनी चाखली असेलच. कोकणातील तौशे भाकरीची चव कधी चाखली आहे का? (Konkan special Breakfast)
तौशे भाकरी ही कोकणातील पारंपरिक पदार्थ. उन्हाळ्यात ही भाकरी आवर्जून नाश्त्यात बनवली जाते.(Konkani cucumber bhakri) याला काकडीचा डोसा, पॅनकेके किंवा भाकरी असं म्हटलं जाते. यासाठी साहित्य देखील कमी लागते. याला आपण धिरडे आणि घावन देखील म्हणू शकतो.(Traditional Konkani recipes) एकदम कुरकुरीत आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तसेच पौष्टिक असल्यामुळे पचायला देखील अगदी हलकी आहे. पाहूयात हा पारंपरिक पदार्थ कसा बनवायचा. (Cucumber flatbread recipe)

मैदा-पाव नको!शिळ्या चपातीचे करा दाबेली रॅप,चवदार स्ट्रीट फूड रेसिपी

साहित्य 

किसलेली काकडी - १ कप 
किसलेले ओले खोबरे -१/४ कप 
तांदळाचे पीठ - २ चमचे 
रवा - ३/४ कप 
चिरलेली हिरवा मिरची - १
गुळाचा पावडर - १ चमचा 
चिरलेला कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 
मीठ - चवीनुसार 
कढीपत्त्याची पाने - आवश्यकतेनुसार 
किसलेले आले - १ चमचा 

">

कृती 

1. सगळ्यात आधी काकडी किसून घ्या. त्यानंतर एका ताटात किसलेली काकडी,आले, कोथिंबीर, गुळाचा पावडर, खोबरे रवा, मीठ आणि इतर साहित्य घाला. 

2. आता त्याला चांगले एकजीव करा. यामध्ये तांदळाचे पीठ घालून मळून घ्या. ३० मिनिटे तसेच ठेवा. 

3. त्यानंतर याचे छोटे गोळे करुन केळीच्या पानावर  ठेवा. भाकरी थापतो तसे थापून घ्या. 

4. आता पॅनला मंद आचेवर गरम करुन त्यावर तयार भाकरी टाका. मंद आचेवर चांगली भाजून दोन्ही बाजून तेल लावून परतवून घ्या. 

5. सर्व्ह करा नाश्त्याला कोकणातील पारंपरिक पदार्थ तौशे भाकरी. 

 

Web Title: Traditional Konkani dish 'Taushe Bhakri' made with cucumber breakfast food a very easy to digest and unique recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.