Lokmat Sakhi >Food > कोकणातील पारंपरिक 'कच्च्या फणसाची भाजी', कुयरीच्या भाजीची खास घरगुती चमचमीत रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवी

कोकणातील पारंपरिक 'कच्च्या फणसाची भाजी', कुयरीच्या भाजीची खास घरगुती चमचमीत रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवी

Traditional Konkan recipe: Kachchha Phansachi Bhaji: Kuyri Bhaji recipe: Raw jackfruit recipes: मसालेदार कच्च्या फणासाची भाजी नक्की करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2025 10:35 IST2025-04-21T10:35:15+5:302025-04-21T10:35:57+5:30

Traditional Konkan recipe: Kachchha Phansachi Bhaji: Kuyri Bhaji recipe: Raw jackfruit recipes: मसालेदार कच्च्या फणासाची भाजी नक्की करुन पाहा.

Traditional Konkan Kachchha Phansachi Bhaji a special homemade sparkling recipe of kuyri bhaji is a summer must do | कोकणातील पारंपरिक 'कच्च्या फणसाची भाजी', कुयरीच्या भाजीची खास घरगुती चमचमीत रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवी

कोकणातील पारंपरिक 'कच्च्या फणसाची भाजी', कुयरीच्या भाजीची खास घरगुती चमचमीत रेसिपी, उन्हाळ्यात करायलाच हवी

उन्हाळ्यात सगळीकडे आंबे आणि फणसाचा घमघमाट सुरु होतो.(Traditional Konkan recipe) कोकणातील अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात फणासाच्या भाजीची चव चाखली जाते.(Kachchha Phansachi Bhaji) गोड असणाऱ्या फसणाच्या गरापासून आइस्क्रीम व इतर पदार्थ आवडीने बनवून खातात.(Kuyri Bhaji recipe) प्रत्येक ऋतूनुसार आपल्याला वेगवेगळ्या भाज्या खायला मिळतात. अगदी फुलं आणि पाणाची देखील भाजी केली जाते.(Raw jackfruit recipes)
कोकणातील काही भागांमध्ये उन्हाळ्यात फणासाचे पदार्थ खाल्ले जातात.(Konkani food traditions) फणसाची गरे, फणसुली, कच्च्या फणासाची भाजी हमखास खाल्ली जाते.(Authentic Konkan flavors) फणसाची भाजी कशी केली जाते. याविषयी अनेकांना माहित नाही. (Homemade bhaji Konkan style) सकाळच्या डब्यात काय बनवायचे असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर मसालेदार कच्च्या फणासाची भाजी नक्की करुन पाहा. 

उन्हाळ्यात मुलांसाठी करा थडंगार 'चॉकलेट चिकू मिल्कशेक', ५ मिनिटांत झटपट होईल

साहित्य

कच्चा फणस - १ मध्यम 
मीठ- चवीनुसार 
तेल- २-३ चमचे 
मोहरी- १/२ चमचा 
जिरे- १/२ टीस्पून 
ठेचलेला लसूण पाकळ्या- १०-१२ 
कढीपत्ता 
बारीक चिरलेला कांदा- १ मोठा
हिंग -१/४ टीस्पून 
हळद- १/२ टीस्पून 
मिरची पावडर- १ टीस्पून 
साठवणीचा मसाला- २ चमचे
मीठ घालून शिजवलेले ओले हरभरे- १ वाटी 
कोथिंबीर 

">

कृती

1. सगळ्यात आधी कुकरमध्ये कच्च्या फणासाचे तुकडे करुन त्यात पाणी घालून २ शिट्ट्या होऊ द्या. 

2. कुकर थंड झाल्यानंतर फणसावरचे साल काढून घ्या. त्यानंतर त्याला ठेचून घ्या, म्हणजे बियांपासून फणस वेगळा होईल. 

3. कढईत तेल घालून त्यात मोहरी, आले-लसूण, हिंग, कढीपत्ता घालून लालसर होऊ द्या. 

4. आता यामध्ये कांदा परतवून घ्या. त्यात हळदी, मिरची पावडर, साठवणीचा मसाला, मीठ, कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून चांगले परतवून घ्या. 

5. यामध्ये आता उकडवलेले चणे आणि उकडलवलेला फणस घाला. वरुन पुन्हा थोडे मीठ घाला. दोन ते तीन मिनिटे चांगले परतवून घ्या. 

6. वरुन पाण्याचा हात मारुन झाकण झाकून तीन ते चार मिनिटे मंद आचेवर शिजू द्या. पुन्हा एकदा परतवून घ्या. गॅस बंद करुन कोथिंबीर भुरभुरा. पुन्हा एकदा भाजी परतवून घ्या. तयार होईल कच्च्या फणासाची भाजी 

 

Web Title: Traditional Konkan Kachchha Phansachi Bhaji a special homemade sparkling recipe of kuyri bhaji is a summer must do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.