उन्हाळ्यात आपण आपल्या आहारात रोज दही ताकाचा समावेश करतोच. रणरणत्या उन्हांत दही आणि ताक यांसारखे थंडगार पदार्थ खाल्ल्याने त्याचा (Dahikandi Recipe) फायदा शरीराला होतोच. उन्हाळ्यात आपल्याला सतत काही ना काही थंडगार खावेसे वाटते. अशावेळी आपण आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स यांसारखे आर्टिफिशियल रंग आणि कृत्रिम गोडवा (How To Make Dahi Kulfi At Home) असणारे पदार्थ हमखास फार मोठ्या प्रमाणावर खातो. परंतु वारंवार (Traditional Dahi Kulfi Recipe) आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्स प्यायल्याने आपल्याला सर्दी, खोकला, घसा बसणे अशा समस्या सतावू शकतात. याचबरोबर, आईस्क्रीम, कोल्डड्रिंक्समध्ये वापरले जाणारे आर्टिफिशियल रंग आणि कृत्रिम साखर आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते( Summer Special Dahikandi Recipe).
यासाठी, उन्हाळ्यात काहीतरी थंडगार खावंसं वाटलं तर, आपण घरच्याघरीच दह्याची मस्त थंडगार दहीकांडी करुन खाऊ शकतो. घरी तयार केलेलं घट्ट दाटसर दही, पाणी आणि साखर असे फक्त तीनच पदार्थ वापरुन आपण हा मस्त इन्स्टंट थंडगार पदार्थ तयार करु शकतो. यात कोणत्याही प्रकारचे आर्टिफिशियल रंग किंवा साखरेचा वापर केला नसल्याने आपण अगदी बिनधास्त लहान मुलांना देखील खायला देऊ शकतो. दह्याची दहीकांडी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. दही - १ कप
२. पाणी - १ कप
२. साखर - १/२ कप
साजूक तूप करण्याची पाहा नवी पद्धत, घरचे तूप होईल झटपट आणि छान रवाळ...
हापूस आंब्याचा राजा असला तरी भारतातले हे ८ आंबे आहेत अतिशय गोड, पाहा कोणता खायचा...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये घट्ट - दाटसर दही ओतून घ्यावे.
२. जितक्या प्रमाणांत दही घ्याल तितकेच पाणी घालावे. दह्यात एक कप पाणी ओतावे.
३. आता हे सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे.
कोकणातील पारंपरिक लुसलुशीत सुरनोळी करा नाश्त्याला, खास कोकणी बेत - रविवार होईल झक्कास!
४. सगळ्यांत शेवटी यात साखर घालावी. साखर संपूर्णपणे विरघळवून घ्यावी. रवीने हे मिश्रण एकत्रित घुसळून घ्यावे.
५. तयार मिश्रण छोट्या छोट्या वाट्यांमध्ये किंवा ग्लासात ओतून घ्यावे. मग या मिश्रणात आईस्क्रीम स्टिक्स घालूंन फ्रिजरमध्ये ६ ते ७ तासांसाठी ठेवून द्यावे.
६. फ्रिजरमध्ये ठेवून हे मिश्रण सेट झाल्यावर बाहेर काढून घ्यावे.
७. आता एका मोठ्या बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यात या वाट्या २ ते ३ सेकंदांसाठी ठेवून दहीकांडी व्यवस्थित डिमोल्ड करुन वाटीतून काढून घ्यावी.
दहीकांडी खाण्यासाठी तयार आहे. उन्हाळ्यात आपण थंडगार दहीकांडी खाण्याचा आस्वाद घेऊ शकता.