Join us

पाऊस स्पेशल बेत: गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात! पाहा टोमॅटो सारची पारंपरिक रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2025 15:12 IST

Tomato Saar Recipe : How To Make Tomato Saar : Tomato Curry For Rice : Konkani Style Tomato Saar : घरभर दरवळणारा तो टोमॅटोच्या साराचा सुगंध आला की पोटातील भूक खवळते...

रोजच्या जेवणात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, उसळी, रस्सा भाजी किंवा आमटी करतो. भात किंवा चपातीसोबत खाण्यासाठी नेहमीची तीच ती डाळ, आमटी खाऊन आपल्याला काहीवेळा कंटाळा येतो. अशावेळी नेहमीच्या पदार्थांपेक्षा काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होतेच. जेव्हा आपल्याला डाळी, उसळी, किंवा आमटी (Tomato Saar Recipe) खाऊन कंटाळा येतो तेव्हा आपण हे आंबट - गोड चवीचे टोमॅटोचे सार झटपट तयार करु शकतो. टोमॅटोच्या (How To Make Tomato Saar) आंबट-गोड रसात भरपूर मसाले, कोथिंबीर आणि ओलं खोबरं वापरुन तयार केलं जाणारं हे टोमॅटोचं सार पचायला हलकं, चवीला उत्तम (Tomato Curry For Rice) आणि आरोग्यदायक असते(Konkani Style Tomato Saar).

जेवणाच्या ताटात जेव्हा गरमागरम भातावर ओतलेलं टोमॅटोचं सार असतं, तेव्हा नेहमीच्या जेवणापेक्षा ४ घास हमखास जास्तच जातात. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाले असल्याने धो - धो कोसळणाऱ्या पावसात गरमागरम भात आणि आंबट - गोड चवीचे, चटपटीत टोमॅटोचे सार खाण्याचे सुख काही औरच असते. घरभर दरवळणारा तो टोमॅटोच्या साराचा सुगंध आला की पोटातील भूक खवळते. हे सार फक्त जेवणातली चव वाढवत नाही, तर थकलेल्या शरीराला उब आणि मनाला समाधान देतं. यंदाच्या पावसात असच आंबट - गोड चवीचं टोमॅटोचं सार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. टोमॅटो - २ कप (मध्यम आकाराचे तुकडे)२. ओलं खोबरं - २ कप ३. काश्मिरी लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून४. हळद - १/२ टेबलस्पून ५. धणे - १/२ टेबलस्पून ६. लसूण पाकळ्या - ६ ते ८ पाकळ्या ७. चिंच - १ टेबलस्पून ८. मीठ - चवीनुसार ९. पाणी - गरजेनुसार१०. तेल - ३ ते ४ टेबलस्पून ११. मोहरी - १/२ टेबलस्पून १२. कडीपत्ता - ६ ते ७ पाने १३. हिंग - चिमूटभर

सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

शिळ्या पोळ्यांची करा मस्त गोड खीर! चवीला उत्तम आणि पौष्टिक पदार्थ - चव एकदा चाखून तर पाहा...

 कृती :- 

१. सगळ्यात आधी टोमॅटोचे मध्यम आकाराचे तुकडे करुन घ्यावेत. मग हे तुकडे पाण्यात हलकेच उकळवून घ्यावेत. टोमॅटोचे तुकडे थोडे थंड होऊ द्यावेत. २. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात उकळवून घेतलेले टोमॅटोचे तुकडे, ओलं खोबरं, काश्मिरी लाल तिखट मसाला, हळद, धणे, लसूण पाकळ्या, चिंच, व चवीनुसार मीठ घालावे. ३. आता मिक्सरमध्ये एकत्रितपणे हे सगळे जिन्नस वाटून घेऊन त्याचे वाटण तयार करून घ्यावे. 

४. एका मोठ्या पातेल्यात थोडे तेल घेऊन त्यात फोडणीसाठी मोहरी, हिंग, कडीपत्ता घालावा. खमंग फोडणी तयार झाल्यावर त्यात तयार टोमॅटोचे वाटण ओतावे. ५. आता या मिश्रणात थोडे पाणी घालून टोमॅटोच्या साराची कंन्सिस्टंसी हवी तशी करावी. त्यांनंतर ३ ते ४ उकळी काढाव्यात. 

गरमागरम टोमॅटोचे सार खाण्यासाठी तयार आहे. भात आणि टोमॅटोचे सार खाण्यासाठी चवीला उत्तम लागते.

टॅग्स :अन्नपाककृती