Lokmat Sakhi >Food > हाय हाय मिरची! तोंडाला येईल चव करा झणझणीत मसाला सिमला मिरची, पावसाळ्यात खास पदार्थ

हाय हाय मिरची! तोंडाला येईल चव करा झणझणीत मसाला सिमला मिरची, पावसाळ्यात खास पदार्थ

tiffin box special bhaji: Shimla mirchi bhaji: monsoon special bhaji: झणझणीत मसाला सिमला मिरची ट्राय करुन पाहा. पावसाळ्यातील खास पदार्थ झटपट तयार होईल आणि सगळे आवडीने खातील, पाहूया रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2025 09:05 IST2025-05-31T09:00:00+5:302025-05-31T09:05:02+5:30

tiffin box special bhaji: Shimla mirchi bhaji: monsoon special bhaji: झणझणीत मसाला सिमला मिरची ट्राय करुन पाहा. पावसाळ्यातील खास पदार्थ झटपट तयार होईल आणि सगळे आवडीने खातील, पाहूया रेसिपी

tiffin box special bhaji spicy masala Shimla mirchi bhaji monsoon special food | हाय हाय मिरची! तोंडाला येईल चव करा झणझणीत मसाला सिमला मिरची, पावसाळ्यात खास पदार्थ

हाय हाय मिरची! तोंडाला येईल चव करा झणझणीत मसाला सिमला मिरची, पावसाळ्यात खास पदार्थ

सिमला मिरचीची भाजी म्हटलं की, अनेकजण नाक मुरडतात. रोज पौष्टिक आणि चविष्ट काय बनवायचं असा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो.(Shimla mirchi bhaji) लवकरच मुलांच्या शाळा सुरु होतील अशावेळी डब्यात काय द्यावं हे आपल्याला सुचत नाही.(monsoon special bhaji) त्यात घरात सिमला मिरची असेल तर विचारुच नका. मुलांना पालेभाज्या, फळभाज्या हा प्रकार मुळीच आवडतं नाही.(rainy season snacks) बाहेरचे पदार्थ खाऊ घालणं किंवा त्यांना बिस्किटे देणे हे त्यांच्या वाढीसाठी हानिकारक असते. (easy bhaji for lunch box)
सिमला मिरचीमध्ये अनेक घटक असतात ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढून पचनसंस्था सुधारते.(how to make Shimla mirchi fry) तसेच वजन कमी होण्यास आणि त्वचा सुधारण्यास मदत होते.(best monsoon tiffin box recipes) या पद्धतीने झणझणीत मसाला सिमला मिरची ट्राय करुन पाहा. पावसाळ्यातील खास पदार्थ झटपट तयार होईल आणि सगळे आवडीने खातील, पाहूया रेसिपी 

प्रवासात ८ दिवस टिकणारी भेंडी मसाला फ्राय, चिकटही होणार नाही-चवीलाही मस्त, पाहा रेसिपी

साहित्य 

उभी चिरलेली सिमला मिरची - १ कप 
लसूण पाकळ्या - ५ ते ६ 
तेल 
धने - १ चमचा 
सुक्या खोबऱ्याचे काप - अर्धी वाटी 
जिरे - १ चमचा 
कढीपत्त्याची पाने - ७ ते ८ 
शेंगदाणे - अर्धी वाटी 
लाल तिखट - १ चमचा 
हळद - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 

कृती 

1. सगळ्यात आधी सिमला मिरची धुवून उभी कापून घ्या.  त्यानंतर कढईत तेल गरम करा. 

2. यामध्ये लसूण पाकळ्या, धने, खोबऱ्याचे काप, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे आणि लाल तिखट चांगले भाजून घ्या. 

3. भाजलेले मसाला थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. 

4. पुन्हा एकदा तेल गरम करुन त्यात सिमला मिरची परतवून घ्या, त्यात हळद आणि मीठ घालून मंद आचेवर शिजू द्या.

5. आता वाटलेला मसाला त्यात घालून चांगले परतवून घ्या. तयार होईल झणझणीत मसाला सिमला मिरची 
 


Web Title: tiffin box special bhaji spicy masala Shimla mirchi bhaji monsoon special food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.