Join us

सुईने लसूण सोलण्याची ट्रिक, झटपट सोला लसूण- वेळखाऊ काम आता होईल फटक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2023 18:35 IST

The Fastest Easiest Way to Peel Garlic लसूण सोलण्याची ही भन्नाट ट्रिक तुम्हीही वापरुन पाहा

मराठमोळ्या घरात क्वचितच असं कोणीतरी असेल जो लसूण खात नाही. लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत. अगदी साध्या वरणाला लसणाची फोडणी दिली तर, त्याची चव दुपट्टीने वाढते. लसणाची चटणी देखील केली जाते. ही चटणी जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून भन्नाट लागते. चव आणि आरोग्य अशी दुहेरी फायदे असतानाही लसूण हा डोक्याला ताप ठरू शकतो. कारण अनेकदा लसूण सोलणे हा कंटाळवाणा टास्क वाटतो.

लसूण सोलताना फार वेळ जातो, व नखं देखील दुखतात. लसूण सोलण्याचे आपण अनेक ट्रिक पाहिले असतील, सध्याची व्हायरल होणारी ट्रिक थोडी हटके आहे. यात लसूण सोलण्यासाठी फक्त २ सेकंदाची गरज आहे, ते ही सुईच्या मदतीने लसूण भरभर सोलून निघतील, ते कसे पाहा(The Fastest Easiest Way to Peel Garlic).

लसूण सोलण्यासाठी वापरा मोठी सुई

सर्वप्रथम, दोन्ही हाताने लसणाला गोल फिरवून थोडं सुटसुटीत करा, एक मोठी सुई घ्या. व लसणाला मधोमध टोचून लसूण बाहेर काढा. लसूण घेताना मोठा लसूण घ्यावा. जेणेकरून तो पटापट सोलला जाईल.

साखर-तूप-गुळ न घालता करा प्रोटीन लाडू, केस गळणे-थकवा-स्किन प्रॉब्लम्स होतील कमी

लसूण सोलण्यासाठी गरम पाण्याचा वापर

करा बटाट्याचा रस्सा, म्हणाल अशी गावरान ठसक्याची झणझणीत भाजी कधी खाल्ली नव्हती!

सगळ्यात आधी लसणाच्या पाकळ्या वेगळे करा. पाणी गरम झाल्यानंतर त्यात लसणाच्या पाकळ्या घाला. लो फ्लेमवर लसूण गरम करा. नंतर गॅस बंद करा. लसूण एक मिनिटासाठी पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे हात न लावता लसणावरील सालं वेगळे होतील. ज्या लसणाची सालं वेगळी झाली नसतील त्यांना हलक्या हाताने चोळून सालं वेगळी करा.

टॅग्स :अन्नकिचन टिप्सस्वच्छता टिप्स