Lokmat Sakhi >Food > फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...

फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...

Thalipeeth Recipe Without Bhajni : How To Make Thalipeeth Without Bhajni : Instant Thalipeeth Recipe : Thalipeeth without Bhajani : फक्त १५ ते २० मिनीटांत भाजणीशिवाय थालीपीठ करण्याची साधीसोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2025 15:14 IST2025-05-06T15:04:15+5:302025-05-06T15:14:26+5:30

Thalipeeth Recipe Without Bhajni : How To Make Thalipeeth Without Bhajni : Instant Thalipeeth Recipe : Thalipeeth without Bhajani : फक्त १५ ते २० मिनीटांत भाजणीशिवाय थालीपीठ करण्याची साधीसोपी रेसिपी...

Thalipeeth Recipe Without Bhajni How To Make Thalipeeth Without Bhajni Instant Thalipeeth Recipe Thalipeeth without Bhajani | फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...

फक्त १५ मिनिटांत करा इन्स्टंट थालीपीठ, चव अगदी भाजणीच्या थालीपीठासारखीच खमंग...

सकाळच्या नाश्त्याला नेमकं रोज नवीन काय करायचं, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतोच. पण सकाळच्या नाश्त्यासाठी काही असे पदार्थ कॉमन असतात की  जे अगदी पटकन तयार करता येतात. यापैकीच एक खास आणि घरांतील सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ म्हणजे थालीपीठ. शक्यतो बहुतेकांच्या घरी थालीपिठासाठीची भाजणी (Thalipeeth Recipe Without Bhajni) ही एकदाच तयार करून ठेवली जाते. परंतु थालीपीठाची भाजणी संपली तर थालीपीठ (How To Make Thalipeeth Without Bhajni) कसं करायचं असा प्रश्न पडतो. अशावेळी आपण भाजणीशिवाय देखील झटपट तयार होणारे इन्स्टंट थालीपीठ करु शकतो(Instant Thalipeeth Recipe).

सकाळच्या घाईगडबडीत अनेकदा नाश्ता तयार करायला पुरेसा वेळ नसतो. अशावेळी झटपट होणारे पदार्थ करण्यावर अधिक भर दिला जातो. यासाठीच, सकाळच्या नाश्त्याला जर थालीपिठाचा बेत करणार असाल, पण भाजणीचं नसेल तरी देखील थालीपीठ कसे करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात. फक्त १५ ते २० मिनीटांत भाजणीशिवाय थालीपीठ करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात.    

साहित्य :- 

१. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ हिरव्या मिरच्या
२. लसूण - ४ते ५ पाकळ्या 
३. ओवा - १ टेबलस्पून  
४. जिरे - १ टेबलस्पून 
५. धणे - १ टेबलस्पून 
६. बडीशेप - १ टेबलस्पून 
७. ज्वारीचे पीठ - २ कप 
८. गव्हाचे पीठ - १ कप 
९. बेसन - १/२ कप 
१०. तांदुळाचे पीठ - १/२ कप 
११. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
१२. कोमट पाणी - गरजेनुसार
१३. हळद - १ टेबलस्पून 
१४. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
१५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
१६. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)

खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...


शेवग्याच्या शेंगांची पानं बहुगुणी! सुपरफूड पानांची करा पौष्टिक चटणी - चवीला उत्तम आयोग्यासाठी फायदेशीर...

कृती :- 

१. सगळ्यांत आधी मिक्सरच्या भांड्यात हिरव्या मिरच्या, लसूण, ओवा, जिरे, धणे, बडीशेप असे सगळे जिन्नस घालून त्याची जाडसर अशी भरड करून घ्यावी. 
२. आता एका मोठ्या परातीत ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, तांदुळाचे पीठ, लाल तिखट मसाला, पांढरे तीळ, हळद, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिरचीचे वाटण असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन गरजेनुसार कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यावे. 

३. आता एका कॉटनच्या रुमालावर पाणी शिंपडून त्यावर तयार पिठाचा गोळा ठेवून थालीपीठ गोलाकार आकारात थापून घ्यावे. 
४. तव्याला तेल लावून त्यावर थापून घेतलेले थालीपीठ घालून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे. 

भाजणीशिवाय तयार केलेल इन्स्टंट थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे. हे गरमागरम तयार थालीपीठ दही किंवा चटणी, सॉससोबत खाण्यासाठी सर्व्ह करावे.

Web Title: Thalipeeth Recipe Without Bhajni How To Make Thalipeeth Without Bhajni Instant Thalipeeth Recipe Thalipeeth without Bhajani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.