Join us
Daily Top 2Weekly Top 5

थायलंडचं सिक्रेट! थाई स्टाईल पेरुचे सलाड कधी खाल्ले का? डाएटवाल्यांसाठी परफेक्ट फूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2025 13:00 IST

Thai guava salad: Thai style guava salad: healthy guava salad: रोज-रोज साधा पेरू खाऊन कंटाळा आला असेल, तर थाई स्टाईल सलाड हा उत्तम पर्याय ठरतो.

सध्या धावपळीच्या जगात वजन कमी करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. त्यात डाएट करणं प्रत्येकाला जमत नाही. डाएट म्हणजे उकडलेलं, चव नसलेलं अन्न असा अनेकांचा गैरसमज.(Thai guava salad) मात्र थायलंडमधील खाद्यसंस्कृतीने हा गैरसमज दूर केला. तिथे हेल्दी पदार्थ म्हणजे पौष्टिकता नाही तर चवीलाही जबरदस्त असतात. असा एक खास आणि झटपट केला जाणारा पदार्थ थाई स्टाईल पेरु सलाड. (Thai style guava salad)पेरु हा फळांचा राजा नसला तरी आरोग्यासाठी सूपरफूड मानला जातो. फायबरने भरलेला पेरु पचन सुधारण्यास, पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतो. तसेच अनावश्यक भूक देखील टाळायला मदत करतो.(healthy guava salad) त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरु अतिशय फायदेशीर आहे. पण रोज-रोज साधा पेरू खाऊन कंटाळा आला असेल, तर थाई स्टाईल सलाड हा उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी कशी बनवायची पाहूया. 

डार्लिंग-डार्लिंग दिल क्यों तोडा, पी लो आलम सोडा! 'धुरंदर' सिनेमातला दूध सोडा सोशल मीडियावर व्हायरल, काय आहे खास?

साहित्य 

कोथिंबीरीचे देठ - १ छोटी वाटी लाल मिरच्या - २ ते ३सोया सॉस - १ चमचा अर्ध्या लिंबाचा रस गूळ - १ चमचा शेंगदाण्याचा कूट - १ मोठा चमचा लाल पेरु - १ वाटी सफरचंद - १ वाटीडाळिंब - १ वाटी पुदिन्याची पाने

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कोथिंबीरीचे देठ, लाल मिरच्या, सॉस, लिंबाचा रस, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून वाटून घ्या  

2. त्यानंतर लाल पेरु, सफरचंद उभ्या आकारात बारीक चिरुन घ्या. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य घ्या. त्यात वरुन वाटलेले सर्व साहित्याचे वाटण घाला. वरुन मीठ घाला. 

3. दाण्याचा कूट, डाळिंबाचे दाणे आणि पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा थाई स्टाईल पेरुचे सलाड. 

English
हिंदी सारांश
Web Title : Thai Style Guava Salad: A Perfect Diet Food Secret!

Web Summary : This article introduces Thai style guava salad as a healthy and tasty option for weight loss. It details the ingredients and easy steps to prepare this fiber-rich, diet-friendly salad, offering a delicious alternative to traditional diet food.
टॅग्स :अन्नपाककृती