सध्या धावपळीच्या जगात वजन कमी करण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. त्यात डाएट करणं प्रत्येकाला जमत नाही. डाएट म्हणजे उकडलेलं, चव नसलेलं अन्न असा अनेकांचा गैरसमज.(Thai guava salad) मात्र थायलंडमधील खाद्यसंस्कृतीने हा गैरसमज दूर केला. तिथे हेल्दी पदार्थ म्हणजे पौष्टिकता नाही तर चवीलाही जबरदस्त असतात. असा एक खास आणि झटपट केला जाणारा पदार्थ थाई स्टाईल पेरु सलाड. (Thai style guava salad)
पेरु हा फळांचा राजा नसला तरी आरोग्यासाठी सूपरफूड मानला जातो. फायबरने भरलेला पेरु पचन सुधारण्यास, पोट दीर्घकाळ भरलेले ठेवतो. तसेच अनावश्यक भूक देखील टाळायला मदत करतो.(healthy guava salad) त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पेरु अतिशय फायदेशीर आहे. पण रोज-रोज साधा पेरू खाऊन कंटाळा आला असेल, तर थाई स्टाईल सलाड हा उत्तम पर्याय ठरतो. ही रेसिपी कशी बनवायची पाहूया.
साहित्य
कोथिंबीरीचे देठ - १ छोटी वाटी
लाल मिरच्या - २ ते ३
सोया सॉस - १ चमचा
अर्ध्या लिंबाचा रस
गूळ - १ चमचा
शेंगदाण्याचा कूट - १ मोठा चमचा
लाल पेरु - १ वाटी
सफरचंद - १ वाटी
डाळिंब - १ वाटी
पुदिन्याची पाने
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आपल्याला कोथिंबीरीचे देठ, लाल मिरच्या, सॉस, लिंबाचा रस, गूळ आणि शेंगदाण्याचा कूट घालून वाटून घ्या
2. त्यानंतर लाल पेरु, सफरचंद उभ्या आकारात बारीक चिरुन घ्या. एका बाऊलमध्ये सर्व साहित्य घ्या. त्यात वरुन वाटलेले सर्व साहित्याचे वाटण घाला. वरुन मीठ घाला.
3. दाण्याचा कूट, डाळिंबाचे दाणे आणि पुदिन्याची पाने घालून सर्व्ह करा थाई स्टाईल पेरुचे सलाड.
