Join us
Daily Top 2Weekly Top 5

पिठ शिजवण्याची झंझट नाही! कुकरच्या एका शिट्टीत करा तांदूळाचे पापड - इतकी सोपी पद्धत कधी पाहिलीच नसेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2026 21:36 IST

Tandulache Papad Recipe : rice papad in pressure cooker : how to make rice papad at home : प्रेशर कुकरच्या फक्त एका शिट्टीत परफेक्ट तांदुळाचे पापड करण्याची सोपी रेसिपी...

उन्हाळा सुरू झाला की प्रत्येक घरात लगबग सुरू होते ती म्हणजे ' उन्हाळी वाळवणाची'. वाळवण म्हटलं की, पापड, सांडगे, कुरडया, लोणची असे अनेक चविष्ट, पारंपरिक पदार्थ तयार केले जातात. यातही पांढरे शुभ्र आणि खुसखुशीत तांदळाचे पापड म्हणजे सर्वांचा जीव की प्राण...पण तांदळाचे पापड बनवणं म्हणजे मोठं दिव्य असतं. तासंतास उभं राहून पीठ शिजवणं, ते गुठळ्या न होऊ देता हलवणं आणि पिठाचा अंदाज घेणं यातच निम्मी शक्ती खर्च होते. अनेकदा पीठ कच्चं राहिल्यामुळे किंवा जास्त शिजल्यामुळे पापड फाटतात, ही भीती वेगळीच!(Tandulache Papad Recipe).

तांदळाचे पापड बनवण्याच्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेकजणी पापड खायला आवडूनही ते तयार करणे शक्यतो नको म्हणून टाळतातच...पण जर तुम्हाला सांगितलं की हेच तांदळाचे पापड अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने, फक्त कुकरच्या एका शिट्टीत तयार करता येतात, तर...आता तांदुळाचे पापड करताना (rice papad in pressure cooker) पिठ शिजवण्याची झंझट विसरा... ही एक नवी स्मार्ट आणि वेळेची बचत करणारी पद्धत वापरून ( how to make rice papad at home) आपण अगदी कमी मेहनतीत कुरकुरीत आणि चविष्ट तांदूळ पापड झटपट तयार करू शकता. पीठ शिजवण्याची अजिबात झंझट नाही, ना तासंतास हलवण्याची गरज! आता आपण चक्क प्रेशर कुकरच्या फक्त एका शिट्टीत परफेक्ट तांदूळ पापड बनवू शकता. ही युक्ती वापरली तर तुमचे पापड अजिबात फाटणार नाहीत आणि दुधासारखे पांढरे शुभ्र होतील... प्रेशर कुकरच्या फक्त एका शिट्टीत परफेक्ट तांदुळाचे पापड (homemade rice papad recipe) करण्याची सोपी रेसिपी...

साहित्य :- 

१. तांदूळ - २ कप २. जिरे - १ टेबलस्पून ३. चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून ४. पाणी - ८ ते ९ कप ५. मीठ - चवीनुसार६. ओवा - १/२ टेबलस्पून ७. बेकिंग सोडा - १ टेबलस्पून ८. तेल - २ ते ३ टेबलस्पून९. हिरव्या मिरच्या - ५ ते ६ (बारीक चिरलेल्या)१०. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

उन्हाळी वाळवण स्पेशल : मिश्र डाळींचे पौष्टिक सांडगे! आजीच्या हातची पारंपरिक चव - वर्षभर राहतील कुरकुरीत... 

नको कडवट ग्रीन टी, ना डाएटिंग! नेहमीच्या चहात करा १ छोटासा बदल - वजन घटेल, पोट होईल सपाट... 

कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यात तांदूळ घेऊन ते पाण्याने किमान ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत. २. एका मोठ्या प्रेशर कुकरमध्ये स्वच्छ धुतलेले तांदूळ, पाणी घेऊन त्यात जिरे, चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ, ओवा, बेकिंग सोडा घालावा. सगळे मिश्रण एकत्रित प्रेशर कुकरमध्ये लावून ३ ते ४ शिट्ट्या करुन मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यावे. ३. मग प्रेशर कुकर उघडून शिजवून घेतलेल्या मिश्रणात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या घालाव्यात. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. 

अर्धा उरलेला नारळ उन्हाळ्यातही राहील एकदम फ्रेश! फ्रिजशिवाय १० दिवस टिकवण्याच्या खास घरगुती टिप्स... 

४. मग एखादं प्लास्टिक किंवा सुती कापड अंथरून घ्यावं. प्लास्टिक असेल वरून हलकेच तेलाचा हात फिरवून घ्यावा. मग तयार मिश्रण गरम असतानाच एक - एक पळी घालून त्यावर प्लास्टिक ठेवून मग वरून ताट ठेवून दाब देऊन पापडाला गोलाकार आकार द्यावा. ५. हे पापड असेच कडक उन्हात ४ ते ५ दिवस व्यवस्थित वाळवून घ्यावेत. पापड संपूर्णपणे व्यवस्थित वाळल्यानंतर हवाबंद डब्यांत भरून साठवून ठेवावेत. 

प्रेशर कुकरमध्ये झटपट बॅटर तयार करून अगदी इन्स्टंट पद्धतीने करता येतील असे कुरकुरीत, खुसखुशीत तांदुळाचे पापड तयार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Easy Rice Papad Recipe: Cook in Pressure Cooker with One Whistle!

Web Summary : Make rice papads quickly using a pressure cooker! Skip the hassle of lengthy cooking. This method saves time, effort, and ensures perfect, crispy papads every time with just one whistle. Follow this simple recipe for homemade goodness.
टॅग्स :अन्नपाककृतीसमर स्पेशल