Join us  

तामिळनाडूचा प्रसिद्ध 'गोधुमा' डोसा, तांदूळ भिजवण्याचीही गरज नाही, बघा झटपट होणारी खास रेसिपी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2024 11:25 AM

How To Make Godhuma Dosa: नेहमीचा तोच तो डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर हा दक्षिण भारतातला प्रसिद्ध गोधुमा डोसा करून पाहा. नाश्त्यासाठी ही एक परफेक्ट हेल्दी रेसिपी आहे. (wheat floor dosa recipe)

ठळक मुद्देया डोस्याला तामिळनाडूमध्ये गोधुमा किंवा गोधुमाई डोसा म्हणतात. हा डोसा गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो

इडली, डोसा हे दक्षिण भारतीय पदार्थ आज अवघ्या देशभर प्रसिद्ध झाले आहेत. एवढंच नाही तर अनेक परदेशी खवय्येही या दक्षिण भारतीय पदार्थांचे चाहते आहेत. आता इडली आणि डोसा करण्याच्या काही टिपिकल पद्धती आपल्याला माहिती आहेत. नेहमी आपण त्याच त्या पद्धतींनी इडली- डोसा करत असतो. पण आता डोस्याचा हा एक एकदम वेगळा प्रकार करून पाहा. या डोस्याला तामिळनाडूमध्ये गोधुमा किंवा गोधुमाई डोसा म्हणतात (Tamilnadu's famous godhuma dosa). हा डोसा गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो (wheat floor dosa recipe). बघा गोधुमा डोसा करण्याची एकदम सोपी रेसिपी. (how to make godhumai dosa)

 

तामिळनाडूचा प्रसिद्ध गोधुमा डोसा करण्याची रेसिपी

साहित्य

१ कप गव्हाचं पीठ

पाव कप तांदळाचं पीठ

पाव कप रवा

मुलांसाठी दूधात घालण्याची शक्तीवर्धक पावडर म्हणजे विकतचं दुखणं? दूध पिण्याचा हट्ट पडेल महागात..

१ लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा

२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर

चिमूटभर हिंग

१ टीस्पून आलं आणि मिरचीची पेस्ट

चवीनुसार मीठ

 

कृती

एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, रवा, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं आणि मिरचीची पेस्ट असं सगळं एकत्र करून घ्या.

त्यानंतर या पिठामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं कालवून घ्या. कालवताना त्यात चवीनुसार मीठ घाला.

पक्ष्यांच्या किलबिलाटाने बहरून जाईल बाग, फक्त ३ गोष्टी करा... बागेत नेहमीच वेगवेगळे पक्षी येतील

हे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्ट नसावं. पीठ भिजवून झाल्यानंतर ते १० ते १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.

यानंतर नेहमी डोसे करतो, तसे या पिठाचे डोसे करा. त्यासाठी आधी तवा गरम करायला ठेवा. तवा गरम झाल्यानंतर त्याला तेल लावा आणि थोडं पाणी शिंपडा.

गरम झालेल्या तव्यावर मध्यभागी डोस्साचं पीठ टाका आणि ते गोलाकार पसरवून घ्या. एखाद्या मिनिटांतच गरमागरम कुरकुरीत गोधुमा डोसा झाला तयार.... 

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती