Join us

महागडी फळं-भाज्या-धान्य विकत आणता, पण त्यातलं पोषण उडून जातंय? पाहा कसं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2025 14:19 IST

Take These Precautions While Cooking Food Otherwise Nutrients Present Food Get Destroyed : What precautions should be taken while cooking so that the nutrients in food do not get destroyed : कोणत्याही पदार्थांमधील पोषण मूल्य नष्ट होऊ नये म्हणून हे खास उपाय...

रोजचा आहार किंवा दिवसभरात आपण जे काही खातो ते आपल्या शरीराला आवश्यक असते. आपल्या शरीराला गरजेची असणारी आवश्यक ती पोषक तत्वे किंवा इतर महत्वाचे घटक रोजच्या आहारातूनच आपल्याला मिळतात. यासाठी नेहमी सकस व पौष्टिक आहार खाणे अतिशय महत्वाचे असते. दिवसभरातील अनेक वेगवेगळ्या (What precautions should be taken while cooking so that the nutrients in food do not get destroyed) प्रकारच्या कामांसाठी आपल्याला ऊर्जा आणि शारीरिक ताकद लागते. ही ऊर्जा आणि शारीरिक ताकद अन्नपदार्थातूनच मिळते. आपण स्वतःला हेल्दी आणि फिट ठेवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश करतो. परंतु काहीवेळा आपण हे पौष्टिक आणि हेल्दी अन्नपदार्थ तयार करताना काही चुका करतो(Take These Precautions While Cooking Food Otherwise Nutrients Present Food Get Destroyed).

या छोट्याशा चुकांमुळेच आपल्या हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांमधील पोषक तत्व नष्ट होतात. ज्यामुळे अन्नपदार्थांमार्फत आपल्याला जे पोषक घटक मिळणार असतात, ते आधीच अन्नपदार्थांतून नाहीसे होतात. असे अन्नपदार्थ खाऊन आपल्या शरीराला आवश्यक त्या पोषक तत्वांचा पुरवठा होत नाही. परिणामी, त्या अन्नपदार्थातील पोषक घटक वाया जातात. अशाप्रकारे, अर्धवट पोषण मूल्य मिळाल्याने आपल्या शरीरात पोषक घटकांचा अभाव निर्माण होतो. यासाठीच, असे होऊ नये म्हणून अन्नपदार्थ शिजवताना किंवा तयार करतं काही गोष्टींची खबरदारी घेणं आवश्यक असते, त्या नेमक्या कोणत्या ते पाहूयात.          

१. डाळी :- आपण रोजच्या जेवणात वेगवेगळ्या प्रकारच्या डाळींचा समावेश करतो. या डाळींमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रोटिन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स व इतर आवश्यक पोषक घटक असतात. जेव्हा आपण सालं असणाऱ्या डाळींचा वापर करतो तेव्हा त्या डाळींची सालं न काढता सालीसहित आहे तसाच वापर करावा. या डाळींच्या सालींमधे भरपूर प्रमाणांत पोषक तत्व असतात त्यामुळे सालं न काढता या डाळींचा वापर करावा. याचबरोबर, डाळी शिजवताना नेहमी त्या गरम पाण्यांत घालून मगच शिजवाव्यात. थंड पाण्यांत घालून डाळी शिजवल्यास डाळींना शिजण्यास भरपूर वेळ लागतो. परिणामी, डाळींमधील महत्वाची पोषक तत्व नाहीशी होतात. 

क्षिती जोगला फार आवडते आजीच्या हातचे आंबट वरण! पाहा आंबट वरणाची पारंपरिक रेसिपी...

२. गव्हाचे पीठ :- रोजच्या चपात्या तयार करण्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचा वापर करतो. गव्हाचे पीठ एकदम बारीक दळून आणू नका. पीठ एकदम बारीक दळल्याने त्यातील पोषक तत्व नाहीशी होतात. यासाठी पीठ बारीक न दळता थोडे जाडसर भरड होईल असेच ठेवावे. यासोबतच, गव्हाचे पीठ फार चाळून घेऊ नका. कारण या पिठातील कोंडा देखील आपल्या शरीराला तितकाच महत्वपूर्ण असतो. जर आपल्याला चपातीच्या पिठात कोंडा नको असेल तर असा कोंडा वेगळा काढून तो पाण्यांत ८ ते १० तास भिजवून ठेवावा. त्यानंतर या पाण्यानेच गावाचे पीठ मळून कणीक तयार करून घ्यावी. कोंड्याच्या पाण्यांने पीठ मळल्याने कोंड्यातील पोषक घटक देखील आपल्या शरीराला मिळतात. 

३. तांदूळ :- तांदुळापासून भात तयार करताना शक्यतो आपण तांदूळ २ ते ३ वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून मगच वापरतो. परंतु असे न करता तांदूळ फक्त एकदाच पाण्यांतून काढून स्वच्छ धुवावा. तांदूळ वारंवार पाण्याने धुतल्याने त्यातील पोषक तत्व कमी होतात. जर आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचा असेल तर सर्वात आधी तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि मगच भिजवा. याचबरोबर, तांदूळ ज्या पाण्यांत भिजवला आहे ते पाणी फेकून न देता त्याच पाण्यात तांदूळ शिजवून घ्यावा. तांदूळ शिजवताना तो गरम पाण्यातच शिजवा थंड पाण्यांत शिजवू नये. 

मिक्सर सतत बिघडतो-पाती तुटतात? तपासून बघा, तुम्ही मिक्सरमध्ये हे ७ पदार्थ वाटत तर नाही ना...

४. पालेभाजी :- सगळ्याच प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. हिरव्या पालेभाज्या कापण्याच्या किंवा चिरण्याच्या आधीच स्वच्छ धुवून घ्याव्यात. हिरव्या पालेभाज्या कापून - चिरुन झाल्यावर धुण्याची चूक करु नये, कारण यामुळे यातील पोषक तत्व कमी होतात. पालेभाज्या शिजत असताना त्यात पाणी घालू नये कारण पाणी घातल्याने त्यातील पोषक तत्वे पाण्यासोबतच उडून जातात. पालेभाज्या शिजत असताना त्यात थेट पाणी घालू नये परंतु वरून थोडे थोडे पाणी हाताने शिंपडून या भाज्या शिजवून घ्याव्यात. हिरव्या पालेभाज्या ज्या भांड्यात शिजत आहेत ते भांड नेहमी झाकून ठेवावं, कारण वाफेवर पालेभाज्या शिजवल्याने त्यातील पोषक तत्व नाहीशी न होता कायम टिकून राहतात. 

चांगल्या क्वालिटीचा गूळ विकत घेण्यासाठी पंकज भदौरिया सांगतात ३ टिप्स, निवडा योग्य गूळ...

५. इतर फळभाज्या :- पालेभाज्यांसोबतच आपण वांगी, बटाटे, दुधी - भोपळा, टोमॅटो, मुळा, बीटरुट अशा फळभाज्या देखील खातो. अशा फळभाज्या कापण्याआधीच स्वच्छ धुवून घ्याव्यात. या भाज्या चिरल्यानंतर धुतल्यास त्यातील पोषक तत्व पाण्यासोबतच वाहून नष्ट होतात.

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स