Lokmat Sakhi >Food > इडली नेमकी आली कुठून? कुणी पहिल्यांदा केली असेल मस्त मऊ वाफाळती इडली..

इडली नेमकी आली कुठून? कुणी पहिल्यांदा केली असेल मस्त मऊ वाफाळती इडली..

Idli Origin : इडलीचं जे रूप तुम्ही आता बघताय त्याचा प्रवास लांब आणि तेवढाच इंटरेस्टींग आहे. या लेखात आज आपण इडलीच्या इतिहासाबाबत जाणून घेणार आहोत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 19:08 IST2025-06-06T17:30:41+5:302025-06-06T19:08:04+5:30

Idli Origin : इडलीचं जे रूप तुम्ही आता बघताय त्याचा प्रवास लांब आणि तेवढाच इंटरेस्टींग आहे. या लेखात आज आपण इडलीच्या इतिहासाबाबत जाणून घेणार आहोत.

Surprising history of idli, you should its interesting journey | इडली नेमकी आली कुठून? कुणी पहिल्यांदा केली असेल मस्त मऊ वाफाळती इडली..

इडली नेमकी आली कुठून? कुणी पहिल्यांदा केली असेल मस्त मऊ वाफाळती इडली..

Idli Origin : भारतात इडली सगळ्यात लोक नाश्त्यापैकी एक आहे. इडली सांबार खाणं सगळ्यांनाच आवडतं. इडली पचायला तर हलकी असतेच, सोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. साऊथ इंडियामध्ये इडली भरपूर खाल्ली जाते. इतकंच नाही तर इडली ही साऊथ इंडियन डिश असल्याचं म्हटलं जाते. पण अनेकांना हे माहीत की, इडली साऊथ इंडियात बनवलेली डिश नाही. म्हणजे ही मूळची साऊथ इंडियन डिश नाही.

इडलीचं जे रूप तुम्ही आता बघताय त्याचा प्रवास लांब आणि तेवढाच इंटरेस्टींग आहे. या लेखात आज आपण इडलीच्या इतिहासाबाबत जाणून घेणार आहोत. जो वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कुठून आली इडली?

इतिहासकार आणि फूड एक्सपर्ट्सचं मत आहे की, इडलीची सुरूवात इंडोनेशियात झाली होती. असं मानलं जातं की, इसवीसन‌ 800 ते 1200 दरम्यान इंडोनेशियामध्ये 'केडली' नावाची एक डिश खूप फेमस होती, जी आजच्या इडलीसारखीच होती. इंडोनेशियात तांदूळ आणि फर्मेंटेशनच्या प्रोसेसचा वापर खूप जास्त होत होता.

काही रिपोर्ट्स सांगतात की, ही डिश अरबमधून आली आहे. अरब व्यापारी भारतात येत-जात होते. ते ही डिश इकडे घेऊन आलेत. पण इडलीचं रूप तेव्हा आतासारखं नव्हतं. त्यात अनेक बदल झालेत आणि आजचं रूप मिळालं.

भारतात कशी पोहोचली इडली?

असं मानलं जातं की, इंडोनेशियातून जे लोक भारतात आले, खासकरून कर्नाटकात ते त्यांच्यासोबत ही डिश बनवण्याची रेसिपी सोबत घेऊन आले. भारतात आल्यावर काही बदल झाले. त्यात स्थानिक  टेक्निकची भर पडली.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, सगळ्यात आधी इडलीचा उल्लेख इसवीसन‌ 920 मध्ये कन्नड साहित्यात आढळतो. त्यात इडलीचा उल्लेख इड्डलिगे' म्हटलं गेलं आहे. त्यात उडीद डाळ ताकात भिजवून आणि काही मसाल्यांसोबत बनवली जात होती. त्यावेळी यात तांदळाचा वापर होत नव्हता.

जसाजसा काळ बदलत गेला 17व्या शतकात इडलीला आजचं रूप मिळालं. यादरम्यान यात तांदळाचा समावेश करण्यात आला. ज्यामुळे इडली आणखी मुलायम आणि टेस्टी झाली. 

Web Title: Surprising history of idli, you should its interesting journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.