Join us

शाळेला सुट्टी लागली की घरीच करा चोकोबार आइस्क्रिम! पाहा झटपट गारेगार रेसिपी, चव विकतपेक्षा भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2025 16:31 IST

Homemade Chocobar ice cream: Chocobar ice cream recipe: How to make Chocobar at home: Easy Chocobar ice cream: Chocolate ice cream bar recipe: No-bake Chocobar ice cream: घरच्या घरी विकतसारखे चोकोबार आइस्क्रिम कसं बनवायचं पाहूया.

उन्हाळा सुरु झाला की, आपल्याला सतत काही तरी थंड खावेसे वाटते. रस्त्यावर पाणी, निरा, नारळपाणी, ताक, लस्सीवाले दिसायला लागतात.(Homemade Chocobar ice cream) ठिकाठिकाणी ज्यूस, सोडावाले देखील असतात. या काळात आइस्क्रिमची देखील मागणी जास्त प्रमाणात असते. (Chocobar ice cream recipe)असे गारगार पदार्थ खाल्ल्यानंतर आपण आजारी पडण्याची देखील शक्यता असते. त्याच हे तयार केलेल पेय, आइस्क्रिम कोणत्या पाण्यापासून बनवले आहे अशी शंका देखील मनात निर्माण होते. (How to make Chocobar at home)आपल्या लहानपणी ५ रुपयांना मिळणारं चोकोबार आइस्क्रिम अधिक फेमस होतं. ५ रुपयांच्या या आइस्क्रिमने घशाला गारवा मिळायचा आणि मन तृप्त व्हायचं. जर आपल्यालाही गार मस्त आइस्क्रिम खायचं असेल तर घरी ट्राय करुन पाहू शकतो. विविध प्रकारांनी आइस्क्रिम घरी तयार करता येते. आइस्क्रिम म्हटलं की मुलांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. त्यांना कितीही खाऊ घातले तरी मन काही भरत नाही. पण हे आइस्क्रिम घरी बनवले तर मुले अधिक आवडीने खातील आणि त्यांचे आरोग्य देखील खराब होणार नाही. घरच्या घरी विकतसारखे चोकोबार आइस्क्रिम कसं बनवायचं पाहूया.

ताज्या-कच्च्या कैरीची झणझणीत आमटी, फक्त १० मिनिटांत करा मस्त पारंपरिक मालवणी पदार्थ

साहित्य 

दूध - अर्धा लिटर साखर - ३ चमचेदूध पावडर - ३ चमचेकॉनफ्लोअर पावडर - १ चमचावॅनिला इसेंस - २ थेंब चॉकलेट - कोटिंगसाठी 

कृती 

1. सगळ्यात आधी दूध गरम करुन त्यात साखर आणि दूध पावडर घालून चांगले एकत्र करा. 

2. आता कपभर पाण्यात १ चमचा कॉनफ्लोअर पावडर घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट उकळ्यात दूधात घालून शिजवून घ्या. 

3. त्यानंतर दुधात वॅनिला इसेंस घालून फेटून घ्या. दूध आता थंड झाल्यानंतर गाळून घ्या. 

4. चॉकलेट वितळवून घेतल्यानंतर आइस्क्रिम मोल्डमध्ये भरा. वरुन कोटिंग करता येईल त्याप्रमाणे चॉकलेट सेट करा. 

5. आता थंड झालेले दूध मोल्डमध्ये टाका. त्यात आइस्क्रिमची स्टिक लावून ७ ते ८ तास डीप फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. तयार होईल गारेगार घरगुती पद्धतीचे चोकोबार आइस्क्रिम 

टॅग्स :अन्नपाककृती